शासकीय नोकरी भरती प्रक्रिया एमपीएससीमार्फत करा मुख्यमंत्र्यांना निवेदन

✍ मुकेश मेश्राम ✍
तालुका प्रतिनिधी लाखनी
जिल्हा भंडारा
7620512045
लाखणी/तुमसर:- मागील दोन वर्षांपासून कोरोना संसर्गामुळे नोकर भरती बंद ठेवण्यात आली. त्यानंतर स्थिती थोडी फार सुधारल्याने नोकर भरतीची प्रक्रिया सुर झाली असली तरी पेपर फुटीच्या माध्यमातून यामध्ये भ्रष्टाचार होत असून बेरोजगार विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे शासनाने राज्यातील नोकर भरतीची प्रक्रिया शासन स्तरावर पारदर्शक राबविण्यात यावी तसेच नोकर भरती प्रक्रिया एमपीएससीच्या माध्यमातून राबवावी अशी मागणी शिवसेनेने तुमसरचे तहसीलदार बाबासाहेब टेळे यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांना केली आहे.
राज्यात शासनाच्या वतीने ज्या नोकरी भरती प्रक्रिया राबवण्यात आल्या आहे. त्या भरतीच्या ज्या कंपन्यांना निवेदन दिल्या होत्या त्या कंपन्यांत भ्रष्ट निघाल्या, किती तरी वेळा परीक्षा रद्द करण्यात आल्या.परीक्षेच्या प्रवेश पत्राच्या गोंधळ तर पेपर फुटी पर्यंत भ्रष्टाचार होत आहे. सदर पेपर फुटीचे धागेदोरे आरोग्य संचालनालय पर्यंत दिसत येत आहेत.त्यामुळे विद्यार्थ्यांची दिशाभूल होत असल्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे .तसेच माडा च्या परीक्षेत घोळ मध्ये रात्री उशिरा परीक्षा रद्द करण्याची वेळ, याच मानसिक व आर्थिक त्रास विद्यार्थ्यांना भोगावा लागत आहे.तसेच या चा फटका लाखो बेरोजगार विद्यार्थ्यांना बसला आहे. यापुढे नोकरी भरती कोणत्याही कंपनीला निविदा पद्धतीने न देता महाराष्ट्र शासनाने शासन स्तरावर सदर नोकरी भरती प्रक्रिया पारदर्शक पणे राबविण्यात यावी तसेच राज्यात शासकीय नोकर भरती ही एम. पी. एस .सी .च्या मार्फत घेण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने तहसीलदार बाबासाहेब टेळे यांना मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्यात आली आहे .
यावेळी निवेदन देताना शिवसेना विभाग प्रमुख अमित मेश्राम, शाखाप्रमुख निखिल कटारे,चैतन्य ढोमणे ,धम्मदीप सूर्यवंशी, मनीष गुरवे ,लंकेश्वर पारधी, संदीप सोनवणे ,महेश इनवाते,तुषार लांजेवार, कमलेश रहांगडाले, निशांत ताजने ,सत्यजित आहाके, इत्यादी तुमसर तालुक्यातील बेरोजगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.