जिल्हा परिषद शाळा, मानोली खुर्द येथे गणित जत्रा संपन्न

51

जिल्हा परिषद शाळा, मानोली खुर्द येथे गणित जत्रा संपन्न

जिल्हा परिषद शाळा, मानोली खुर्द येथे गणित जत्रा संपन्न
जिल्हा परिषद शाळा, मानोली खुर्द येथे गणित जत्रा संपन्न

खुशाल सूर्यवंशी
राजुरा शहर ग्रामीण
प्रतिनीधी
8378848427

राजुरा : -जि. प. उच्च प्राथमिक शाळा, मानोली खुर्द येथे दि. 22/12/2021 ला गणित तज्ञ श्रीनिवासन रामानुजम यांच्या जयंती निमित्त गणितोत्सव, गणित रांगोळी, वकृत्वस्पर्धा, गणित साहित्य जत्रा/मेळावा, गणित एककांचा कृतीयुक्त वापर, राष्ट्रीय व सहकारी बँक चलन देवाणघेवाण शिल्प भरणे, गणित उखाणे, गणित कविताचे आयोजन करण्यात आले. स्वातंत्राचा अमृत महोत्सव अंतर्गत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
शाळा व केंद्र स्तरावर विद्यार्थांची निवड करुन विशेष प्रोत्साहन बक्षीस देऊन गणित विषय सोप्या पद्धतीने रुजविण्यासाठी यशस्वीतेने गणित जत्रेचे नियोजन विस्तार अधिकारी मनोज गौरकार , केंद्र प्रमुख विलास देवाळकर व मुख्याध्यापक गोविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गणित शिक्षक राजेश पवार व वनपाल सोयाम सा. शिक्षक यांनी स्पर्धाचे व जत्रेचे यशस्वीपणे गणित जत्रा भरवली. सहयोगी शिक्षिका सिता मेश्राम, संध्या थिपे, प्रतिभा रायपुरे व शाळा मुख्यमंत्री यश नैताम तर सुत्रसंचालन सुप्रिया व संस्कृती विद्यार्थिनी केले तर आभार श्रावणी विद्यार्थीनीने मानले.