पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांचे “हर घर जल “मिशन पूर्ण करण्यास कटिबद्ध : सुधीर मुनगंटीवार

57

पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांचे “हर घर जल “मिशन पूर्ण करण्यास कटिबद्ध : सुधीर मुनगंटीवार

बल्लारपूर मतदार संघातील पाणी पुरवठा योजनांसंदर्भात प्रधान सचिवांसह घेतली आढावा बैठक

पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांचे "हर घर जल "मिशन पूर्ण करण्यास कटिबद्ध : सुधीर मुनगंटीवार बल्लारपूर मतदार संघातील पाणी पुरवठा योजनांसंदर्भात प्रधान सचिवांसह घेतली आढावा बैठक
पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांचे “हर घर जल “मिशन पूर्ण करण्यास कटिबद्ध : सुधीर मुनगंटीवार
बल्लारपूर मतदार संघातील पाणी पुरवठा योजनांसंदर्भात प्रधान सचिवांसह घेतली आढावा बैठक

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपूर
मो 9764268694

मुंबई: बल्लारपूर मतदारसंघातील पोंभूर्णा, मूल आणि बल्लारपूर या तीनही तालुक्यातील प्रत्येक गावात सुरळीत पाणीपुरवठा व्हावा आणि घराघरातील प्रत्येक व्यक्तीला पुरेसे व स्वच्छ पेयजल उपलब्ध व्हावे यासाठी माजी अर्थमंत्री, लोकलेखा समिती प्रमुख आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांशी बुधवारी सविस्तर चर्चा केली आणि प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढला.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, जलजीवन मिशन या अंतर्गत या तिनही तालुक्यात सुरू असलेल्या कामांची सद्यस्थिती आणि पूर्णत्वास नेण्यासाठी नियोजन याविषयी प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांनी सखोल महिती दिली. फ्लोराइडयुक्त पाणी असलेल्या गावांच्या समस्येकडेही त्यांनी लक्ष वेधले. ग्रामीण जनतेच्या आरोग्याशी निगडित या समस्येवर उपाय म्हणून आर ओ मशिन्स ची सोय करता येईल, तशी तरतूद व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

बल्लारपूर मतदारसंघातील १६८ गावांत शंभर टक्के नळ जोडणी आणि सुरळीत स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा अशी आग्रही मागणी त्यांनी केली.पुढील दोन महिन्यांत अपूर्ण कामे पूर्ण व्हावीत; देशगौरव मा पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी यांचे “हर घर जल” हे स्वप्न साकार करण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून जेथे आवश्यकता आहे तेथे सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही श्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.*

या बैठकीला पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांच्यासह सचिव अभिषेक कृष्णा, अभिषेक चक्रवर्ती, जल जीवन मिशन चे कार्यकारी संचालक, स्वच्छ भारत मिशन चे कार्यकारी संचालक, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चंद्रपूर चे कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद चंद्रपूर येथील ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.