श्री रविप्रभा मित्र संस्था रायगड यांचे, पोलीस निरीक्षक संदीपान सोनवणे साहेब यांना निवेदन.
नंदकुमार चांदोरकर
माणगाव तालुका प्रतिनिधी
8983248048
माणगाव : आज दिनांक २३ डिसेंबर रोजी श्री रविप्रभा मित्र संस्था रायगड अध्यक्ष श्री रवींद्रजी लाडसाहेब व संस्थेचे सदस्य यांनी म्हसळा पोलिस निरीक्षक संदीपान सोनावणे साहेब यांची भेट घेऊन म्हसळा तालुक्यात झालेले अपघात व दि.२२ डिसेंबर रोजी ढोरजे ईथे झालेला कार आणि दुचाकी चा भिषण अपघात यामध्ये दुचाकी चालक संतोष जाधव या.सुरई हा गंभीर जखमी झाला आहे.ही गंभीर बाब लक्षात घेऊन पुढे होणारे अपघात कशा पद्धतीने टाळता येऊ शकतात व नाताळ आणि वर्षं अखेर सुट्टी असल्याने अनेक पर्यटक यांचे येणे वाढले आहे, वाहतूक कोंडी, अल्पवयीन दुचाकीस्वार, धुमस्टाईल दुचाकी चालविणे, वेगावर नियंत्रण,न्यु ईंग्लिश स्कूल ते स्टेट बँक या रोडपर्यंत गतीरोधक लावणे या संदर्भात सविस्तर चर्चा करून संस्थेच्या वतीने पोलिस निरीक्षक संदीपान सोनावणे साहेब यांना निवेदन देण्यात आले, या सर्व गोष्टींचा विचार करून या वर प्रतिबंधक कारवाई करण्यात येईल व कोणत्या प्रकारचे अपघात होणार नाहीत याची दक्षता घेण्यात येईल असे पोलिस निरीक्षक संदीपान सोनावणे साहेब यांनी आश्वासन दिले आहे.यावेळी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष श्री रवींद्रजी लाडसाहेब, सल्लागार संतोष उध्दरकर, खजिनदार सुशांत लाड, संतोष घडशी, खारगाव सरपंच श्री अनंत नाक्ती, जांभूळ सरपंच किरण मोरे ,प्रेस क्लब अध्यक्ष शशिकांत शिर्के, म.न.से.तालुकाअध्यक्ष सौरभ गोरेगावकर,नारायण नाक्ती, कृष्णा म्हात्रे उपस्थित होते.