कैचीचे धाक दाखवून ब्युटी पार्लर संचालिकेवर नराधमाने केले लैंगिक अत्याचार लाखनी पोलीसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला केले अटक

75
कैचीचे धाक दाखवून ब्युटी पार्लर संचालिकेवर नराधमाने केले लैंगिक अत्याचार लाखनी पोलीसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला केले अटक

कैचीचे धाक दाखवून ब्युटी पार्लर संचालिकेवर नराधमाने केले लैंगिक अत्याचार

लाखनी पोलीसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला केले अटक

कैचीचे धाक दाखवून ब्युटी पार्लर संचालिकेवर नराधमाने केले लैंगिक अत्याचार लाखनी पोलीसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला केले अटक

✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱 मो.नं.9373472847📞

भंडारा : दिनांक २२ डिसेंबर २०२३ रोजी भंडारा जिल्ह्यातील तालुका लाखनी येथे पिडीत विवाहित महिला ही अनुसूचित जातीची आहे. हे माहीत असतांनाही ओळखीचे इसमाने ब्युटी पार्लर मध्ये प्रवेश करून आत मधून दाराची कडी लावून कैचीचे धाकावर जबरीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना शुक्रवार सायंकाळी ६:४५ वाजता दरम्यान घडलेली आहे. अन्यायग्रस्त महिलेचे फिर्यादी वरून लाखनी पोलिसांनी लैंगिक अत्याचार व ॲक्ट्रासीटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचे नाव तुषार रामचंद्र बुरडे वय ३६ वर्षे, रा. काटी, तालुका मोहाडी, जिल्हा भंडारा असे आहे. पोलिसाकडून आरोपीस अटक करण्यात आली असून उपविभागीय पोलिस अधिकारी सुशांत सिंग तपास करीत आहेत. 
     शहरात एक विवाहित महिला कुटुंबाचे भरण पोषण करण्यासाठी ब्युटी पार्लर चा व्यवसाय करीत असून ती महिला स्वयंसहाय्यता बचत गटाचेही काम करते. त्यामुळे तुषार बुरडे सोबत तिची ओळख पटली होती. नेहमीप्रमाणे तिने शुक्रवारी दुकान उघडले. सायंकाळच्या सुमारास कोणीही ग्राहक नसल्याने ती एकटीच पार्लरमध्ये होती. अंदाजे ४:१५ वाजताच्या सुमारास तुषार बुरडे मोटरसायकल ने आला. व ब्युटी पार्लर मध्ये येऊन आतून दाराची कडी लावून, तू माझ्या सोबत चल, मला तुझ्या सोबत शरीर सबंध प्रस्तापित करू दे. असे बोलून पार्लर मधील केस कापण्याची कैची हातात घेऊन बळजबरीने पार्लर मध्ये असलेल्या बेड वर वाकवून जबरजस्तीने लैंगिक अत्याचार केले. व महिलेचे केसांची ओढाताण व चेहऱ्यावर थापड मारून शिवीगाळ केली. तथा मारण्यापिटण्याची धमकी दिली. तसेच पिडीत महिला अनुसूचित जातीची आहे. हे त्याला माहीत असतांना सुद्धा घाणेरडे कृत्य केल्याचे पिडीत विवाहितेचे फिर्यादी वरून लाखनी पोलिसांनी अपराध क्रमांक ४१८/२०२३ कलम ३७६(२)(एन), ३४२, ३२३, ५०४, ५०६ भादवि तथा अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक सुधारित कायदा २०१५ चे सहकलम ३(१)(डब्ल्यू)(आय)(॥), ३(२)(५)(५अ) अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक केली आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी सुशांत सिंग तपास करीत असून पोलिस निरीक्षक सत्यवीर बंडीवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील सोनवाने, पोलिस उपनिरीक्षक माधव परशूरामकर, पोलिस हवालदार सुभाष राठोड, राजेंद्र कुरुडकर, प्रशांत गुरव, पोलिस शिपाई संदेश कानतोडे, क्रांतिश कराडे सहकार्य करीत आहेत. पुढील तपास सुरु आहे.