ब्रम्हपूरी तालुक्यातील बरडकीन्ही येथे खंजिरी भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी उपस्थित राहून गावकऱ्यांच्या आनंदात सहभागी झाले.
स्वीटी गेडाम
चंद्रपूर ग्रामीण प्रतिनिधी
मो.7498051230
ब्रम्हपुरी :-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे माणसातील देव शोधत सेवेला धर्म समजणारे संत होते. भारताला पुढे नेण्यासाठी सर्व जाती धर्म पंथातील लोकांना एकत्र आणले पाहिजे. समाजाच्या प्रगतीसाठी समाज निर्भीड बनवण्यासाठी, समाजाला व्यसनमुक्त करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. देशाच्या शत्रुंविरूध्द लढा उभारण्यासाठी सैनिकांना आपल्या भजनांतून प्रेरणा देणारे, समाजाला योग्य मार्गदर्शन करीत समाज उभा करणारे ते संत होते.
आमदार म्हणून समाजातील दुःखी माणसाचं दुःख वेचण्याच काम मी करतोय. कारण माणूस हा माणसाचा आधार झाला पाहिजे ही माझी भावना आहे. मी संतांच्या विचारांचा पायीक आहे. ग्रामीण भागात होणाऱ्या अश्या भजन स्पर्धांमुळेच जनसेवेंचे विचार मला आत्मसात करता आले.