“गृहमंत्री होश में आओ”च्या नाऱ्यांनी संग्रामपूर दणानले”

69
"गृहमंत्री होश में आओ"च्या नाऱ्यांनी संग्रामपूर दणानले"

“गृहमंत्री होश में आओ”च्या नाऱ्यांनी संग्रामपूर दणानले”

"गृहमंत्री होश में आओ"च्या नाऱ्यांनी संग्रामपूर दणानले"

संविधान संरक्षण समिती संग्रामपूर च्या वतीने जन आक्रोश मोर्चा

✍️अनिता हातेकर ✍️
संग्रामपूर तालुका प्रतिनिधी
मो. 84597 75380

संग्रामपूर (बुलढाणा):- संग्रामपूर येथील पत्रकार भवन पासून ते संग्रामपूर तहसील कार्यालयावर संविधान संरक्षण समितीच्या वतीने विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने आंबेडकरवादी संविधान प्रेमी आणि बौद्ध समाज बांधव सहभागी झाले होते. हा मोर्चा शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आला होता. या मोर्चाची सुरक्षा करण्यासाठी समितीने प्रशिक्षित केलेले सुरक्षा रक्षक देखील तयनातीत ठेवण्यात आले होते. आणि तामगाव पोलीस स्टेशन कडून देखील पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हा मोर्चा पत्रकार भवन संग्रामपूर पासून तहसील कार्यालयावर येऊन तहसीलदार संग्रामपूर यांचे मार्फत महामहीम राष्ट्रपती यांना समितीच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

ज्यामध्ये १) १० डिसेंबर रोजी परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोरील संविधानाच्या शिल्पाची विटंबना काही जातीयवादी समाजकंटकांनी संविधान प्रतीची फाडतोड करून केली. सदर घटनेचा उद्रेक सर्व परभणीत झाला असून त्या समाजकंटकाला अटक करण्यासाठी भीमसैनिक समाज बांधव संविधान प्रेमी रस्त्यावर उतरले त्यामुळे तिथल्या जातीयवादी पोलीस प्रशासनाने भीमसैनिकांना बेदम मारहाण केली. व संध्याकाळच्या वेळी वस्त्यांमध्ये जाऊन कोंबिंग ऑपरेशन करून घरात दिसलेल्या लोकांना दिसेल त्याला ओढून बेदम मारहाण केली. त्या जातीवादी पोलीस प्रशासनाचे जिल्ह्याचे एसपी व परभणी येथील पीआय व ज्या ज्या पोलिसांनी समाज बांधवांना मारहाण केली त्यांचे निलंबन करून त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावा.
२) देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदीय सभागृहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केल्याने अमित शहा यांचा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तात्काळ राजीनामा घ्यावा.तसेच संपूर्ण देशातील आंबेडकरवादी व संविधान प्रेमींची जाहीर माफी मागावी व बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केल्यामुळे अमित शहा यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करावा.
३)परभणी या घटनेचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर आंदोलन करणारा संविधान प्रेमी एक आंदोलक म्हणून सोमनाथ सूर्यवंशी एक लॉ चा विद्यार्थी संविधानाची विटंबना झाली म्हणून आंदोलन केले. त्यामुळे त्याला पोलीस कोठडीमध्ये बेदम मारहाण करून त्याची निघून हत्या केली सदर प्रकरणाची सीबीआय चौकशी करून मारहाण करणाऱ्या जातीवादी पोलिसांवर 302 चा गुन्हा दाखल करावा.
४) अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील बुंदेलपुरा या गावांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर काही जातीवादी समाजकंटकांनी स्मारकाच्या आजूबाजूंनी त्रिशूल रोऊन बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करून जातीय दंगल घडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनुवादी विचारांच्या समाजकंटकांवर गुन्हा दाखल करून कार्यवाही करावी.
वरील सर्व मागण्या संविधान संरक्षण समिती संग्रामपूर तालुक्याच्या वतीने करण्यात आल्या आहेत.
संग्रामपूर तालुक्यातील आंबेडकरी जनतेमध्ये होणारा उद्रेक थांबवावा व ज्या ज्या समाजकंटकांनी जातीवादी पोलिसांनी ह्या घटना घडवल्या त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अन्यथा संपूर्ण जिल्ह्यातिल आंबेडकरवादी संविधान प्रेमी जनतेच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा घेऊन आल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही यावेळी संविधान संरक्षण समितीच्या वतीने देण्यात आला आहे.