बहुतांशी क्रिकेटपटू बेरोजगार; बीसीसीआयचेही दुर्लक्ष

ते जगज्जेते आहेत. पण त्यांच्यामधला कुणी ऑर्केस्ट्रामध्ये गाणी गातो, कुणी शेती करतो, तर कुणी दूध विकून आपली उपजीविका करतो. त्यांनी विश्वचषक जिंकला तो क्रिकेटमध्ये. तरीही त्यांची अवस्था दयनीय अशीच. त्यांना कायमस्वरूपी नोकरी नाही. एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धातील प्रत्येकी दोन विजेतेपदे तसेच आशिया चषक आणि चार द्विपक्षीय मालिका जिंकलेले अंध क्रिकेटपटूंच्या नशिबी उपेक्षा आहे.

संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) झालेला एकदिवसीय विश्वचषक जिंकून गतविजेत्या भारताने त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला. मात्र या संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या १७ पैकी १२ क्रिकेटपटू बेरोजगार आहेत. देशाचे प्रतिनिधित्व करूनही क्रिकेटपटूंना भरपाई रजा मिळालेली नाही.

वलसाडचा (गुजरात) अष्टपैलू खेळाडू गणेश मुंडकर हा २०१४ पासून खेळत आहे, तो संघाचा अविभाज्य घटक आहे. मात्र त्याची परिस्थिती हलाखीची. आईवडील शेतीकाम करतात. त्याचे स्वत:चे छोटेखानी किराणा मालाचे दुकान आहे. आंध्र प्रदेशच्या कुर्नूल येथील प्रेम कुमार कायमस्वरूपी अंध आहे. ऑर्केस्ट्रामध्ये गाणी गाऊन तो चरितार्थ चालवतो.

वलसाडचा आणखी एक अष्टपैलू अनिल आर्यचे कुटुंब आठ जणांचे आहे. त्याचे वडील शेती करतात. तो दूध विकतो. अंध क्रिकेटमधील विराट कोहली म्हणून ओळखला जाणारा आंध्र प्रदेशचा वेंकटेश्वर रावला कायमस्वरूपी नोकरी नसल्याने लग्न पुढे ढकलावे लागले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here