२०१९ मध्ये भारतात तब्बल ८२ हजार लहान मुली हरवल्या होत्या, यापैकी ४० टक्क्यांहून अधिक मुलीं अजूनही बेपत्ता असल्याचा अंदाज..

60
२०१९ मध्ये भारतात तब्बल ८२ हजार लहान मुली हरवल्या होत्या, यापैकी ४० टक्क्यांहून अधिक मुलीं अजूनही बेपत्ता असल्याचा अंदाज..

सिद्धांत
२५ जानेवारी २०२२:जगभरामध्ये ११ ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय बालिका दिवस साजरा केला जातो. भारतामध्ये राष्ट्रीय पातळीवर २४ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिवस साजरा केला जातो. देशभरातील बालिकांच्या हक्क आणि अधिकारांबद्दल जागरूकता वाढवणे, बालिकांना शिक्षणाच्या, वैयक्तित विकासाच्या सामान संधी निर्माण करून देणे आणि आपल्या दैनंदिन आयुष्यात बालिका समाजातील वाईट प्रवृत्तीपांसून सुरक्षित राहतील अशी समाजव्यवस्था तयार करण्यासाठी कर्तव्यबध्द असणे यांसारख्या बाबींचा आजच्या दिवशी प्रचार केला जातो.

महिला आणि बाल विकास मंत्रालयाने 24 जानेवारी 2008 रोजी पहिल्यांदा राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला. इंदिरा गांधी यांनी 24 जानेवारी 1966 रोजी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.म्हणून 24 जानेवारी हा राष्ट्रीय बालिका दिन म्हणून निवडला गेला.

भारत सरकारमार्फत वर्षभर लहान मुलींच्या विकासासाठी, शिक्षणासाठी, संरक्षणासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ, सुकन्या समृद्धी योजना यांसारख्या योजना राबवल्या जातात. परंतु आजही वृत्तपत्राचे रकाने, टीव्ही चॅनेल लहान मुलींच्यावरील अत्याचार,स्त्री भ्रूणहत्या यांसारख्या गुन्ह्यांच्या बातम्याने भरलेल्या असतात. स्त्रियांच्या सुरक्षेसाठी उत्तम मानल्या जाणाऱ्या १७० देशाच्या रँकिंगमध्ये भारताचा १४८ वा नंबर आहे. स्त्रियांसाठी भारत देश अजूनही धोकादायक देशांच्या यादीमध्ये येतो. भारतामध्ये मुलींना जन्मापासून तर कधीकधी जन्माच्या आधीपासून अनेक संकटाना सामोरे जावे लागते.

युनाइटेड नेशन पॉप्युलेशन फंडने २०२० साली जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार भारतामध्ये जवळपास ४.६ मुलींची भ्रूणहत्या केली जाते. राष्ट्रीय गुन्हा शाखेच्या रिपोर्टनुसार २०१९ मध्ये तब्बल ८२ हजार मुली हरवल्या होत्या. यापैकी ४० टक्क्यांहून मुलींचा अजूनही पत्ता लागलेला नाही. लहान मुलींना होणारी मारहाण, हत्यांच्या अगणित घटना घडत असतात. विज्ञान आणि तंत्रज्ञानांत वर्षोनुवर्षे प्रगती करणाऱ्या भारतामध्ये अशा घटनांवर रोख लावणे गरजेचे आहे. त्यासाठी लहान बालिकांचे जगणे सुरक्षित असेल, असा समाज घडविण्याची जबाबदारी आपली आहे. लहान बालिकांचे हक्क, त्यांचे अधिकार, त्यांच्या सुरक्षेसाठी उपलब्ध असलेल्या योजनांची माहिती शहरी, ग्रामीण भागातील मुलींपर्यंत, त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे.

लहान मुलींवर होणाऱ्या अन्यायाविरोधात तक्रार करण्यासाठी, त्यांचे संरक्षण करण्यासाठी सरकारी आणि पोलिसांच्या हेल्पलाईन.

चाईल्डलाईन इंडिया: १९०८ (२४-तास / टोल फ्री संपर्क क्रमांक)
अठरा वर्षापर्यंतच्या मुलांच्या हक्कांचे आणि अधिकरांचे संरक्षण करण्याचे काम ह्या संस्थेमार्फत केले जाते. भारतातील ५९८ जिल्हे आणि जवळपास १४३ रेल्वे स्टेशनवर चाईल्डलाईन इंडियाचे कार्यालये आहेत.
केंद्रीय महिला हेल्पलाईन नंबर: १०९१
राष्ट्रीय महिला आयोग हेल्पलाईन: ७८२७१७०१७०

महाराष्ट्रातील हेल्पलाईन नंबर.
मुंबई रेल्वे पोलीस: ९८३३३३११११
मुंबई पोलीस महिला हेल्पलाईन: ०२२-२२६३३३३३, २२६२०१११
महाराष्ट्र महिला आयोग : ०७४७७७२२४२४/ ०२२ -२६५९२७०७
महाराष्ट्र महिला हेल्पलाईन: 022-२६११११०३, १२९८, १०३
मजलिस – महाराष्ट्र: ०२२ -२६६६१२५२ / २६६६२३९४

महाराष्ट्र महिला आणि बाल विकास आयोगातर्फे राज्यात महिला, विशेषतः लहान मुलींच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवल्या जातात. बलात्कार पिडीत, लैंगिक शोषण पिडीत बालक आणि हल्ला पिडीतांकरिता मनोधैर्य योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना, बाल संगोपन संस्था, महिला समुपदेशन केंद्र, अत्याचारग्रस्त पिडीत महिलांसाठी सावित्रीबाई फुले बहूउद्देशीय महिला केंद्र, बाल सल्ला केंद्र, बाल संगोपन योजना, इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना,अनाथालय, महिला स्वीकृती केंद्रे आणि संरक्षित गृहे यामधील निराधार आणि परित्यक्ता विधवांच्या मुलींच्या विवाहाकरीता अनुदान आणि किशोरी शक्ति योजना सारख्या बालिका सशक्तीकरणाच्या योजनांची माहित महाराष्ट्र महिला आणि बाल विकास आयोगाच्या वेबसाइट: https://womenchild.maharashtra.gov.in/contentmi/homecontent/schemes.php वर सविस्तर उपलब्ध आहे.