गुरूकृपा पेट्रोल पंप देतोय अपघाताला आमंत्रण ?

54
गुरूकृपा पेट्रोल पंप देतोय अपघाताला आमंत्रण ?

गुरूकृपा पेट्रोल पंप देतोय अपघाताला आमंत्रण ?

गुरूकृपा पेट्रोल पंप देतोय अपघाताला आमंत्रण ?

🖋️साहिल सैय्यद
📲 9307948197

घुग्घूस : औद्योगिक शहर इथे रस्त्यावर दिवसरात्र वाहनच वाहन चालतात यामुळे पेट्रोल – डिजल ही शहराची प्रमुख गरज आहे
यामुळे शहरात रस्त्याच्या दोन्ही बाजूला पेट्रोलपंप आहे.
ज्यामुळे वाहन धारकांना वाहनात इंधन भरणे सोयीचे होते.

मात्र शहरातील गुरुकृपा पेट्रोलपंप जवळ पंपावर जाण्यासाठी विरुद्ध दिशेने जाणाऱ्या महामार्गावर रस्ता द्विभाजकाच्या मधोमध मार्ग निर्माण करण्यात आला आहे.
हा अत्यंत धोकादायक असून चंद्रपूर महामार्गाने जातांना नागरिक अचानक पंपाकडे वळण
घेतात यामुळे अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे.
रस्त्यावर मोठं मोठे वाहन उभे असतात यामुळे ही अपघातांची शक्यता असते यापूर्वी ही गुरुकृपा पंपावर आपल्या वडीला सोबत सायकल वर जाणाऱ्या सुष्टी परागे या अकरा (11) वर्षीय
मुलीला गुरुकृपा पंपवर डिजल भरण्यासाठी आलेल्या वंदना ट्रान्सपोर्टच्या MH 34 AB 7032 या वाहनांच्या खाली येऊन मृत्यू झाला आणि या ही ठिकाणी ट्रान्सपोर्टरने पोलीस स्टेशनमध्ये दुसराच वाहन MH 34 AB 9319 केल्याचा धक्कादायक प्रकार त्यावेळेस समोर आला होता.
अपघातांची ही मालिका सुरूच असून दोन दिवसांपूर्वी ही छोट्या स्वरूपाचा अपघात झाला आहे.
यावर प्रतिबंध लावण्यासाठी शासनाने योग्य पाऊल उचलावे अशी नागरिकांची मागणी आहे