अज्ञात इसमाचा दगडांनी ठेचून केला खून, गोंदियातील मुर्री येथील घटना , दोन आरोपींना अटक

52
अज्ञात इसमाचा दगडांनी ठेचून केला खून, गोंदियातील मुर्री येथील घटना , दोन आरोपींना अटक

अज्ञात इसमाचा दगडांनी ठेचून केला खून, गोंदियातील मुर्री येथील घटना , दोन आरोपींना अटक

अज्ञात इसमाचा दगडांनी ठेचून केला खून, गोंदियातील मुर्री येथील घटना , दोन आरोपींना अटक

✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा / गोंदिया📱 मो.नं.9373472847📞

गोंदिया : बिहार राज्यातून रोजगारासाठी गोंदियात आलेल्या तरुणाची दगडाने ठेचून निर्घुन हत्या केल्याची खळबळ जनक घटना गोंदियाच्या मुर्री गावात घटली आहे.
दगड आणि विटांनी ठेचून एका अनोळखी युवकाचा दोन आरोपींनी खून केल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास गोंदिया शहरालगत असलेल्या मुर्री येथे उघडकीस आली. या घटनेत गोंदिया शहर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. नितीन शरणागत व चंद्रमा उखरे, रा.मुर्री अशी अज्ञात युवकाचा खून करणाऱ्या आरोपींची नाव आहे. प्राप्त माहितीनुसार गोंदिया शहर पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई सुशांत धारगावे हे आपल्या सहकाऱ्यांसह गस्तीवर असताना एमडीटीवर आर्यन चुटे याने काॅल करून मुर्री येथील जिल्हा परिषद शाळेच्या फाटकासमोर अनोळखी व्यक्ती जखमी अवस्थेत पडला असल्याची माहिती दिली. यावरून धारगावे आणि त्यांचे सहकारी पोलिस शिपाई बाळणे यांनी घटनास्थळ गाठले.
दरम्यान रक्तबंबाळ अवस्थेत ३५ ते ४० वयोगटातील अनोखळी व्यक्ती पडलेला दिसला. त्याच्या आजूबाजूस विटाचे तुकडे पडलेले होते. त्याच्या डोक्यावर, कपाळावर, चेहऱ्यावर व शरीरावर जखमा होत्या. दगड, विटांनी चेहरा ठेचण्यात आला होता. दरम्यान, गंभीर जखमी अवस्थेतील त्या युवकाला येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा पहाटे अडीच वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी मुर्री येथील नितीन शरणागत व चंद्रमा उखरे यांना गोंदिया शहर पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी त्या युवकाचा नेमका कोणत्या कारणामुळे खून केला, हे तपासात पुढे येईल. पुढील तपास पीएसआय सैदाने करीत आहेत. 

*खूनाचे कारण गुलदस्त्यात*
मुर्री येथील दोन आरोपींना अज्ञात युवकाचा खून नेमका कुठल्या कारणावरुन केला हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. गोंदिया शहर पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून या आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. लवकरच या खून प्रकरणाचे रहस्य उलगडेल तसेच खून झालेल्या अज्ञात युवकाची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याचे शहर पोलीसांनी सांगितले.