राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा; सुदृढ लोकशाहीसाठी मतदान प्रक्रियेत सहभाग वाढावा : जिल्हाधिकारी सौरभ कटियार

राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा; सुदृढ लोकशाहीसाठी मतदान प्रक्रियेत सहभाग वाढावा : जिल्हाधिकारी सौरभ कटियार

राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा; सुदृढ लोकशाहीसाठी मतदान प्रक्रियेत सहभाग वाढावा : जिल्हाधिकारी सौरभ कटियार

✒️ सुमित देशमुख✒️
अमरावती जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
📱9022532630

अमरावती, दि. 25 : आगामी निवडणुकीत मतदारांनी मतदान प्रक्रियेत उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन जिल्ह्याचा मतदानाचा टक्का वाढवावा. सुदृढ लोकशाहीसाठी मतदान प्रक्रियेत नवमतदार व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले.

14 व्या राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त छत्रपती शिवाजी सभागृह, मोर्शी रोड अमरावती येथे मतदार जनजागृती व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, पोलीस अधीक्षक विशाल आनंद शिंगुरी, मनपा आयुक्त देवीदास पवार, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, उपायुक्त संजय पवार, उपजिल्हाधिकारी रणजित भोसले, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठचे निबंधक तुषार देशमुख, उप जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, तहसिलदार विजय लोंखडे आदी यावेळी उपस्थित होते.

श्री. कटियार म्हणाले की, निवडणूकीत घटत असलेले मतदानाचे प्रमाण चिंतेचा विषय असून मतदान शतप्रतिशत व्‍हावे यासाठी प्रशासनाव्दारे अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे. आगामी काळात लोकसभा व विधानसभा निवडणूक होणार आहेत. या निवडणुकीत मतदार व नवमतदारांनी मतदान प्रक्रियेत उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन जिल्ह्याचा मतदानाचा टक्का वाढवावा. तसेच नवमतदारांना मतदानाचा हक्‍कासोबत त्‍यांना त्‍यांच्‍या कर्तव्‍याप्रती जाणीव निर्माण व्‍हावी, यासाठी महाविद्यालयीन स्‍तरांवर प्रशासनाव्दारे विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. मतदानाच्‍या दिवशी अनेक नागरिक मतदानाबाबत विविध कारणांनी अनास्‍था दाखवून मतदान करीत नाहीत. त्‍या मतदारांना मतदानाविषयी महत्‍त्‍व पटवून दिले पाहिजे. मतदारांनी कोणत्‍याही प्रलोभनाला बळी न पडता मतदानाचा हक्‍क निर्धास्‍तपणे बजवावा, असेही ते यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here