मतदार जनजागृती रॅलीला जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी झेंडी

मतदार जनजागृती रॅलीला जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी झेंडी

मतदार जनजागृती रॅलीला जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी झेंडी

✒️सुमित देशमुख ✒️
अमरावती जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
📱9022532630

अमरावती:- राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आज शहरातून मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून इर्विन चौक येथून मार्गस्थ करण्यात आले. या रॅलीमध्ये मोबाईल प्रात्यक्षिक व्हॅन, मतदार जनजागृती रथ, बॅनर व विद्यार्थ्यांव्दारे मतदार जनजागृतीपर घोषणा देत रॅली मोर्शी रोड मार्गे छत्रपती शिवाजी सभागृह येथे पोहचली. या रॅलीमध्ये शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी व नवमतदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी उपस्थिताना मतदार दिनाची शपथ देण्यात आली.

मतदार नोंदणीत उत्कृष्ट काम करणारे प्रत्येक विधानसभा मतदार संघातून पर्यवेक्षक, मतदान केंद्र अधिकारी तसेच शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी, जेष्ठ मतदार, उत्कृष्ट पत्रकार, भटक्या विमुक्त जमातीचे समाजसेवक यांचे सत्कार यावेळी करण्यात आले. तसेच 18 वर्षावरील मतदान नोंदणी केलेल्या युवक-युवतींना मान्यवरांच्या हस्ते मतदाराचे ओळखपत्र वितरित करण्यात आले.

उप जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांनी मतदानाचे महत्‍त्व याबाबत उपस्थिताना प्रास्ताविकेतून माहिती दिली. मतदार नोंदणी ही निरंतर प्रक्रिया असून नवीन मतदारांची नोंदणी निवडणूक आचारसंहिता लागू होईपर्यंत सुरु आहे. याचा लाभ नवमतदारांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे संचालन शिप्रा मानकर यांनी तर आभार उपजिल्हाधिकारी रणजित भोसले यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here