श्री चंडिका देवी पुर्न:दर्शनसोहळ्याला भावीकांची अलोट गर्दी. सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.
नंदकुमार चांदोरकर
माणगाव तालुका प्रतिनिधी
8983248048
माणगांव :- तळा तालुक्यातील नवसाला पावणारी आणि तळे वासियांची श्रद्धास्थान असलेली श्री चंडिका ग्रामदेवी उत्सव सोहळा पौष चतुुुर्दशी व पौणिमा २४/२५ जानेवारी २०२४ रोजी आयोजन करण्यात आले होते तळा येेेथील बारा वाड्यांचे हे ग्रामदेवता मंदीर शहरांतील अठरा पगड जाती या मंदीर सोहळ्यात समाविष्ट होत असतात.यावेळी यजमान पदाचा मान राणेचीवाडी यांना मिळाला.ता. २४ जानेवारी रोजी सकाळी १०वा. श्रीदेवीची गादी श्रीकांत वेदक यांच्या घरापासून मंदीरापर्यत भजन ढोल ताशा बाजाच्या गजरात वाजत गाजत नेली जाते. दुपारी ३ ते ७ महीलांचे हळदीकुंकू समारंभ सौ.माधुरी घोलप नगराध्यक्षा संगीत भजन, ४/६डॉ.संतोष झापकर (तळा) अजित कडकडे यांचे शिष्य यांचा शास्त्रीय संगीत गायनाचा कार्यक्रम,सांय.७ ते ८ धुपारती पंचपदीसुतारआळीरात्रौ.९/११ ह.भ.प.प्रमोद महाराज जगताप (बारामती) यांचे वारकरी संप्रदायाचे किर्तन. रात्रौ११ राणेचीवाडी यांचे जागर भजन.ता.२४ पहाटे ५.३० काकडारती बाजारपेठ मित्रमंडळ पहाटे ६.३०वा संजय केळकर (पौराहीत्य) गुरूजी सहकारी रेवदंडा यांनी केले षोडशोपचार पुजा श्री देवीचा अभिषेक पुजाअर्चा,नवचंडी होमहवन श्रीचंडिका देवीपूजनाचा मान पुर्वापार सोनार समाजाचा असल्याने सौ.वश्री.विश्वेश वेदक.श्रीगणेश पुजनाचा मान ग्रामस्थ सौ.व श्री.महादेव बैकर व नवग्रह होमहवन, सौ.व श्री.ऍड.चेतन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आली आणि सकाळी ११ वा. बारावाडी दिंड्यांचे आगमन सर्व गावातुन वाजतगाजत येणारे दिंडी पालखी सोहळे हे जणु गावातील आगळी वेगळी पर्वणीच ठरते या धार्मिक सोहळा महीलासह अबाल वृद्धांंना व माहेरवाशीणीना येण्याची संधी मिळते.यामुळे संपुर्ण परिसर भक्तीमय होउन गेले होते मंदिरा समोर भक्तांसाठी भव्य प्रांगणात उभारलेले आकर्षक मंडप,भक्तांच्या स्वागतासाठी स्वयंसेवक दर्शनासाठी लागलेल्या भाविकांच्या रांगा देवीच्या मिळालेल्या दर्शनामुळे त्यांच्या चेहऱ्यावरीलआनंद प्रसन्नतायावेळी जाणवतहोती देवीच्या दर्शनानंतरभाविकांनामहाप्रसादा ची सोय केली जाते या महाप्रसादाला असंख्य भाविक आवडीने आनंदाने येतात महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी तळा शहरातील शाळा महाविद्यालय आय. टी.आय काॅलेज येथील विद्यार्थी शिक्षक वर्ग व्यापारी डाॅक्टर्स पत्रकार तहसीलदार,शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर संपर्क प्रमुख अरूण चाळके तालुका प्रमुख प्रद्युम्न ठसाळ प्रतीष्ठीत मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.रात्रौ.९ ते१२ सांस्कृतिक कार्यक्रमअशा कार्यक्रमांचे आयोजन होतै भाविकांची श्रध्दा आणि भक्ती यामुळे सारा परिसर भक्तीमय होऊन गेला होता यावेळी सुश्राव्य गायन व किर्तनश्रवणाचा लाभ अनेक श्रोत्यांनी घेतला.पुर्वापार मंदिरात साऱ्या वतनदारांना मिळत असलेला पुजेचा अधिकार लाभ वतन जतन करुन ठेवणारी धार्मिकता,पावित्रता सर्व धर्म समभाव जातीय सलोखा जपणारे हे श्री चंडिका मंदिर ट्रस्ट आहे.या महोत्सवाला अनेकजण देणगी रुपाने वस्तू स्वरुपात मदत करीत असतात.श्री चंडीका देवी पुर्न:दर्शन सोहळा तालुक्यातील एक आगळा वेगळा धार्मिक सोहळा विषेश आकर्षण ठरत आहे.अशा भव्य दिव्य विविध धार्मिक सोहळ्याचे आयोजन विश्वस्त मंडळ, कार्यकारी मंडळ, वतनदार,सदस्य यांचे नियोजनाखाली ग्रामस्थ यांच्यासहकार्याने पुर्न:दर्शन महोत्सव सोहळाची मोठ्या उत्साहात सांगता झाली.