हंसराज अहिर यांनी अयोध्येतील रामललांचे घेतले दर्शन

50
हंसराज अहिर यांनी अयोध्येतील रामललांचे घेतले दर्शन

हंसराज अहिर यांनी अयोध्येतील रामललांचे घेतले दर्शन

हंसराज अहिर यांनी अयोध्येतील रामललांचे घेतले दर्शन

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर, 25 जानेवारी
राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी गुरूवार, 25 जानेवारी रोजी अयोध्येस भेट देवून रामललांचे दर्शन घेतले. देशात परस्पर स्नेह, शांतता व बंधूभाव वृद्धींगत व्हावा तसेच देशवासीयांना सुख, समृद्धी व निरामय आरोग्य लाभो, अशी प्रभु चरणी प्रार्थना केली.
सोमवार, 22 जानेवारी रोजी अयोध्या येथील प्रभु श्रीरामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होती. त्या ऐतिहासिक सोहळ्याचे निमंत्रण हंसराज अहीर यांना देण्यात आले होते. परंतु, त्याच दिवशी त्यांच्या कन्येचा विवाह समारंभ असल्याने ते या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे गुरूवारी त्यांनी अयोध्येस जावून श्री रामललांचे दर्शन घेतले व पूजा अर्चना केली.