घुग्घुस येथे दोन दिवसीय भव्य धम्म संमेलन
🖋️साहिल सैय्यद /प्रतिनिधि
घुग्घुस: शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या वर्धापन दिनानिमित्त आणि भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त २६ आणि २७ जानेवारीला दोन दिवसीय भव्य धम्म संमेलनाचे आयोजन बौध्द सर्कल समिती घुग्घुस आणि नवबौद्ध स्मारक तथा बहुउद्देशीय समिती घुग्घुसतर्फे करण्यात आलेले आहे.
२६ जानेवारीला धम्म संमेलनाचे उद्घाटन अरुणाचल प्रदेश येथील पुज्यनीय भंतेजी वण्णासामी महाथेरो यांच्या हस्ते सकाळी ११.३० वाजता होणार असुन यावेळी नागपूर येथील पुज्यनीय भंते महातिस्स, पुज्यनीय भंते धम्म प्रकाश संबोधी थेरो चंद्रपूर, पुज्यनीय श्रद्धारखीत प्रकाश महाथेरो चंद्रपूर, पुज्यनीय भंतेजी रत्नमणी थेरो यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे. उद्घाटना नंतर लगेच पुज्यनीय भंते संघाची धम्मदेशना होणार आहे.
दुसऱ्या सत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर २०२५ च्या काळात भारतीय लोकशाहीची दुरावस्था याला येथील व्यवस्था जवाबदार कशी ? या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादाचे प्रमुख मार्गदर्शक अनंता केरबाजी भवरे औरंगाबाद, तर अध्यक्ष प्रा. रवि कांबळे सर चंद्रपूर हे राहणार आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, आमदार देवराव भोंगळे, एसीसीचे दिगांमर्थी सत्यनारायण, मुख्याधिकारी नगर परिषद घुग्घुसचे निलेश रांजनकर, वेकोलिचे मुख्य महाप्रबंधक आभासचंद्र सिंह, ओबीसी समाजाच्या प्रतिनिधी म्हणून डॉ. राणी किशोर बोबडे, मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधी अभियंता शिबा शाहा, बौद्ध समाजाच्या प्रतिनिधी डॉ. प्राची खैरे, आदिवासी समाजाचे प्रतिनिधी अभियंता अभिषेक मडावी, ईसाई समाजाचे प्रतिनिधी स्टीफन सुंदेला, शिख समाजाचे प्रतिनिधी जतिंदर सिंह दारी हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.
सायंकाळी नागपूर येथील प्रख्यात प्रबोधनकार स्वप्नील मेश्राम यांचा संगीतमय प्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे.
२७ जानेवारीला सकाळी ११:३० वाजता माता जिजाऊ, माता सावित्री, माता रमाई यांचे ऋण स्त्रियांना फेड़ता येईल का ? या परिसंवादाचे आयोजन ऍड. स्मिता कांबळे उच्च न्यायालय तथा इंडिया अगेंस्ट ई. व्ही. एम.च्या राष्ट्रीय समन्वयीका यांच्या अध्यक्षतेखाली व सुजाता लाटकर केंद्रीय शिक्षिका, चंद्रपूर प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित राहणार तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. राजेंद्र पाल गौतम, माजी मंत्री दिल्ली यांची विशेष उपस्थिती राहणार असून यावेळी प्रमुख उपस्थिती डॉ. विश्वास झाडे, सामाजिक कार्यकर्ते, चंद्रपूर, शामराव सोनटक्के पोलिस निरिक्षक घुग्घुस व भिवराज सोनी सामाजिक कार्यकर्ते, चंद्रपूर हे राहणार आहे.
सायंकाळी ६ वाजता महाराष्ट्राचे प्रख्यात प्रबोधनकार संविधान मनोहरे, अमरावती यांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम राहणार आहे. तरी घुग्घुस व आजुबाजुच्या परिसरातीला नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन बौद्ध सर्कल समिती व नवबौद्ध स्मारक समिती द्वारे करण्यात आले आहे.