गोरेगांव दिंडोशी पूर्व येथील फर्निचर मार्केटला भीषण आग.
✍️ पप्पू वि. नायर ✍️
मुंबई शहर प्रतिनिधी
📞 7304654862 📞
मुंबई :- गोरेगांव पूर्व येथील दिंडोशी खडकपाडा फर्निचर मार्केट मधे शनिवारी सकाळी 11वा 15 मिनिटांच्या सुमारास भीषण आग लागली. विविध प्रकारच्या लाकडी सामान असलेल्या 6 गाळ्यांना आग लागली असून, आगीची तीव्रता एवढी भीषण होती कि संपूर्ण परिसरात आग पसरत गेली. तात्काळ घटनास्थळी पोलीस पोहचून अग्निशमन दलाला पाचरणा करण्यात आली.
आगीमुळे परिसरात काळ्या धुराचे मोठ – मोठे लोंढे निघत होते. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 9 गाड्या येऊन, अगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम चालू केले. लवकरात लवकर अगीवर नियंत्रण मिळेल, असे अग्निशमन दलाकडू सांगण्यात आले.
या आगीत फर्निचर गोडाऊन मधले लाकडी सामान, प्लाय वूड थर्माकोल, भंगार मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले. आगीची तीव्रता भीषण वाढल्याने अग्निशमन दलाच्या जवानांची अगीवर नियंत्रण मिळवण्याची कसरत होत होती. सदर अगीचे कारण समजू शकले नसून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाच्या जवानांकडून होत आहे.