श्रीलंका दौरा: विराटला विश्रांती; रोहितकडे नेतृत्व

44

नवी दिल्ली:श्रीलंकेत ६ मार्चपासून रंगणाऱ्या तीन देशांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची आज घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीला विश्रांती देण्यात आली आहे. विराटच्या अनुपस्थितीत रोहित शर्माकडे भारतीय संघाचं नेतृत्व सोपवलं आहे. तर शिखर धवनला उपकर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे.
या मालिकेतील पहिली लढत भारत आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे. निवड समितीनं विराट, धोनीसह भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव यांनाही विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. दुखापतीमुळं यादव दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेत खेळू शकला नाही. विशेष म्हणजे सुरेश रैनावर निवड समितीनं पुन्हा विश्वास दाखवला आहे. या दौऱ्यासाठी त्याची निवड केली आहे. दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंतलाही संधी दिली आहे.