हिंगणघाट अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी 4 वर्षे सक्तमजुरी.

54

हिंगणघाट अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी 4 वर्षे सक्तमजुरी.

 4 years hard labor in case of molestation of Hinganghat minor girl.

प्रशांत जगताप प्रतिनिधी 25 फेब्रुवारी
हिंगणघाट:- शहरातील संत तुकडोजी वार्ड येथील रहीवासी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी 24 फेब्रुवारी रोजी जिल्हा सत्र न्यायधिश आर. एन. माजगांवकर यांनी आरोपी पिंटू उर्फ नितेश खुशाल धोटे वय 27 वर्ष या आरोपीस बाल अत्याचार कायद्यातंर्गत 4 वर्षे सक्तमजुरी तसेच 2 हजार रुपये दंडाची शिक्षा देण्यात आली.

13 मार्च 2017 रोजी आरोपी पिंटू उर्फ नितेश खुशाल धोटे रा. उमरी (येडे) याने पीडितेचे वडील काम करीत असलेल्या कंपनीतील मित्र असल्याचे सांगुन पिण्यासाठी पाणी मागीतले. पीडितेची आई घरात पाणी आणण्यासाठी गेली असता आरोपीने 16 वर्षीय अल्पवयीन पीडितेचा विनयभंग केला होता. सदर पिडीतेने आरडाओरड केली असता आरोपी नितेश तेथुन पसार झाला. या प्रकरणी हिंगणघाट पोलिसात तक्रार केली असता आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद केला. सदर प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर शासकीय अधिवक्ता दीपक वैद्य यांनी याप्रकरणातील आठ साक्षिदार तपासले. न्यायालयाने सबळ पुराव्यामुळे बाल अत्याचार कायद्यांतर्गत 4 वर्ष सक्त मजुरी तसेच 2 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 6 महिने सजा सुनाविली यासह 1 वर्ष सक्त मजुरी व 1 हजार रुपये दंड, न भरल्यास 3 महिने सक्तमजुरी तसेच 1 वर्ष सजा सुनाविण्यात आली. आरोपीच्या वतीने अ‍ॅड. वि.पी. वैद्य यांनी तर सरकारच्या वतीने शासकीय अधिवक्ता अ‍ॅड दीपक वैद्य यांनी बाजू मांडली.