भूगाव संत गाडगे महाराज जयंती प्रार्थनेच्या माध्यमातून साजरी.

प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी
भुगाव:- 23 फेब्रुवारी संत गाडगे महाराज जयंती गावातील युवक व विधार्थी मित्रांनी प्रार्थनेच्या माध्यमातून समाज मंदिरात साजरी करण्यात आली. बहुतांश युवकांनी समाज सुधारक संत गाडगे महाराजांचे विचार, कार्य समाजाला योग्य शिकवण देऊन चांगल्या, सुसंस्कृत, बुद्धिवादी, विवेकनिष्ठ, सुसंस्कारयुक्त समाजाची घडण करावयाची असल्यास अंधश्रद्धा, बुवाबाजी, धर्माविषयीच्या चुकीच्या कल्पना यांच्या विरोधात समाजजागरण करायला हवं असे थोर समाज सुधारक संत गाडगे महाराजांचे विचार प्रविण ऊगेमुगे, अनिरुद्धभाऊ शेवडे ,योगेशभाऊ चिंचोलकर, दिलीपभाऊ थूल, अरविंद मसराम यांनी विद्यार्थी मित्रांन समोर मांडले व या कार्यक्रमाचे सूत्र संचालन जगदीशभाऊ धुमने यांनी केले. या कार्यक्रमाला उपस्थित गावातील प्रविण ऊगेमुगे, अरविंद मसराम, अनिरुद्ध शेवडे, अनिल पोटदुखे, योगेश चिंचोलकर, जगदीश धूमने, निलेश धूमने, निखिल शंभरकर, साहिल सावंत, महादेवरावजी धोपटे, दिलीप थुल, बंदुजी सिरसागर आदी संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी व गावकरी उपस्थित होते.