देवळीच्या शारदा काळेने पटकविला आंतरराष्ट्रीय ब्रायडेल पुरस्कार.

61

देवळीच्या शारदा काळेने पटकविला आंतरराष्ट्रीय ब्रायडेल पुरस्कार.

Deoli's Sharda Kale won the International Bridal Award.
Deoli’s Sharda Kale won the International Bridal Award. 

आशीष अंबादे प्रतीनिधी 25 फेब्रुवारी
देवळी:- नववधूच्या सौंदर्यकरण कलेमध्ये प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय कीर्तीचा ब्रायडेल पुरस्कार हा देवळीच्या सौ. शारदा अमोल काळे या मेकअप आर्टिस्ट महीलेने पटकविला आहे. ममता शर्मा आणि मोनिका शर्मा या सौंदर्य क्षेत्रातील मोठया कलावंतांनी भोपाळच्या कान्हा सिटी येथे, 22 फेब्रुवारीला नववधूचे सौंदर्य कसे करावे, या विषयावर एक सेमिनार आयोजित केले होते.

या सेमिनारला विख्यात हिंदी चित्रपट अभिनेत्री महिमा चौधरी, रिमी सेन आणि आंतरराष्ट्रीय मेकअप गुरु अनुराग आर्य वर्धन हे उपस्थित होते. यानंतर झालेल्या ब्रायडेल चषक स्पर्धेत संपूर्ण भारतातून 2000 पार्लरचालक आणि कलावंतांनी भाग घेतला होता. त्यामध्ये पहिल्या मानाचा चषकरुपी पुरस्कार हा शारदा काळे हिने पटकविला. या प्रित्यर्थ काळे यांचे शहरांमध्ये कौतुक केल्या जात आहे.