आयुध निर्मितीत जिल्हास्तरीय कंत्राटदारांना वाव द्या : खासदार बाळू धानोरकर

52

आयुध निर्मितीत जिल्हास्तरीय कंत्राटदारांना वाव द्या : खासदार बाळू धानोरकर

आयुध निर्माणीचे खासगीकरणास विरोध

Give space to district level contractors in arms production: MP Balu Dhanorkar
Give space to district level contractors in arms production: MP Balu Dhanorkar

मनोज खोब्रागडे प्रतिनिधी
चंद्रपूर :- जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात रक्षा मंत्रालयाचे आयुध निर्माणींचा मोठा उद्योग आहे. या कारखान्यात नागपूर, पुणे, भंडारा, जळगांव प्रमाणेच जिल्हास्तरीय कंत्राटदारांना कामगार पुरवठा व इतर कामामध्ये प्रधान्य मिळण्याचे दृष्टीने GEM पोर्टल मध्ये सुधारणा करण्यासाठी कंत्राटदार संघटनेने दिलेल्या निवेदनांवर सकारात्मक निर्णय घेण्याची सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी आयुधनिर्माणी येथील हिरा हाऊस येथे संपन्न झालेल्या बैठकीत महाप्रबंधक राजीव पुरी यांना केल्या. यावेळी उपमहाप्रबंधक ओझा, उपमहाप्रबंधक भोला, श्रीकुमार पिल्ले, गौरीप्रसाद शाहा, राजू ठावरे, अशोक ताजने, अनुप परमाणिक यांची उपस्थिती होती.

आयुध निर्माणाचे खाजगीकरणाची चर्चा राज्यात जोरात सुरु असून आयुध निर्माणीला अदानी – अंबानींच्या घशात होऊ देणार नाही असे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले. आयुध निर्माणी ला खाजगीकरणा पासून वाचविण्यासाठी जनतेसोबत रस्त्यावर उतरून विरोध करू असा ईशारा खासदार बाळू धानोरकर यांनी दिला.

या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आले. या भागातील युवक बेरोजगार आहेत. आयुध निर्माणींमध्ये राज्य बाहेरील मोठ्या उद्योगपतींना काम दिल्या जाते. त्यामुळे स्थानिक कंत्राटदार व युवकांच्या हाताला काम मिळत नाही. त्यामुळे या भागातील युवकांमध्ये बेरोजगारीत वाढ होत असून युवकांमध्ये असंतोष दिसून येत आहे. त्यामुळे येत्या काळात स्थानिकांना काम मिळण्याकरिता संघर्ष करू असा ईशारा खासदार बाळू धानोरकर यांनी दिला.