नागपूरमध्ये 16 वर्षीय मुलीचे दोरीने हातपाय बांधून बलात्कार,  गर्भवती राहिल्यानंतर ही घटना उघडकीस

55

नागपूरमध्ये 16 वर्षीय मुलीचे दोरीने हातपाय बांधून बलात्कार,  गर्भवती राहिल्यानंतर ही घटना उघडकीस.

पाच महिन्यांपूर्वी पीडित मुलगी घरी एकटी होती. नराधम हा मुलीच्या घरात घुसला. दोरीने तिचे हातपाय बांधले आणि तिच्यावर अत्याचार केला. याबाबत कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली.

In Nagpur, a 16-year-old girl was raped with her hands and feet tied with a rope, after she became pregnant
In Nagpur, a 16-year-old girl was raped with her hands and feet tied with a rope, after she became pregnant

युवराज मेश्राम प्रतिनिधी

नागपूर, 25 फेब्रुवारी:- देशाची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे हातपाय बांधून बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे, पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे.

नागपूर जिल्ह्यातील मौदा पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. पाच महिन्यापूर्वी घडलेली घटना आता समोर आली आहे. एका 31 वर्षीय युवकाने 16 वर्षीय मुलीचे हातपाय बांधून तिच्यावर अत्याचार केला. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी मौदा पोलिसांनी अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून अत्याचारी युवकाला अटक केली. विशाल मेश्राम, असे अटकेतील युवकाचे नाव आहे.

पाच महिन्यांपूर्वी पीडित मुलगी घरी एकटी होती. आरोपी विशाल हा मुलीच्या घरात घुसला. दोरीने तिचे हातपाय बांधले आणि तिच्यावर अत्याचार केला. याबाबत कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. काही दिवसांपूर्वी मुलीची प्रकृती खालावली. नातेवाइकांनी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मुलगी गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी मुलीच्या नातेवाइकांना सांगितले. नातेवाइकांनी विचारणा केली असता, आरोपी विशाल याने अत्याचार केल्याचे तिने नातेवाइकांना सांगितले. त्यानंतर मुलीसह नातेवाइकांनी मौदा पोलीस स्टेशन गाठले. विशाल याच्याविरूद्ध तक्रार दिली. मौदा पोलिसांनी विशाल याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील करीत आहेत.