नात्याला काळीमा फासणाऱ्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला दहा वर्षांची सक्तमजुरी.

प्रतिनिधि 24 फेब्रुवारी
अमरावती:- जिल्यातील मोर्शी तालूक्यातील आडगाव येथील रहावासी असलेल्या नराधम बापाने आपल्या स्वताःच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या हैवान नराधम बापाला अमरावती जिल्हातील न्यायालयाने 10 वर्ष सक्तमजुरिची शिक्षा दिली आहे.
मोर्शी तालुक्यातील अडगाव येथील पीडिता ही तिसऱ्या वर्गात शिकत होती. तिचा वडील हा संधी साधून शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता. विशेष म्हणजे, अनेक वर्षे हा प्रकार चालत राहिला. वडील आपल्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडत होते, अशी तक्रार पीडित मुलीने केली होती.
12 जानेवारी 2019 रोजी पीडिता आजीकडे गेली. त्यानंतर 19 जानेवारीला आरोपी पिता हा तिला परत आणण्यासाठी गेला, तेव्हा तिने नकार दिला. त्यावेळी पित्याने तिला मारहाण केली. पीडित मुलीने तिच्यावरील अत्याचाराबाबतची माहिती आजीला दिली. त्यामुळे आजीने पीडितेसोबत जाऊन शिरखेड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्याआधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले.
याप्रकरणात सरकारी पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक रीना कोरडे यांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण केला. याप्रकरणातील साक्षीदार व पुरावे ग्राह्य मानून न्यायमूर्ती एस. ए. सिन्हा यांच्या न्यायालयाने आरोपीला दहा वर्षे सक्तमजुरी तसेच पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील पंकज इंगळे यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून वानखडे यांनी सहकार्य केले.