गांधी नगरातील रस्ता बांधकाम सुरू करा- तुमसर शिवसेना

56

गांधी नगरातील रस्ता बांधकाम सुरू करा- तुमसर शिवसेना

गांधी नगरातील रस्ता बांधकाम सुरू करा- तुमसर शिवसेना

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱

लाखणी/तुमसर :- नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्रमांक ८ च्या गांधी नगर येथील डांबरी रस्ता खराब झाल्यामुळे सिमेंट रस्ता बांधकामाचे कार्यादेश काढण्यात आले. यानंतर दोन आठवड्यापूर्वी रस्ता खोदकाम करण्यात आला. परिणामी नागरिकांना येता- जाता नाहक त्रास सहन करावा लागत असून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. याप्रकरणी स्थानिक लोकांनी संताप व्यक्त करीत संपूर्ण माहिती शिवसेनेला देत रस्ता बांधकाम सुरू करण्यासाठी संबंधितांना सांगण्याचे सांगितले होते. याबाबत शिवसेनेने दखल घेत मौका स्थळी जाऊन पाहणी केली आणि संबंधित कंत्राटदाराला बोलावून रस्ता बांधकाम सुरू करण्याची मागणी केली यावर येत्या शुक्रवार रोजी रस्ता बांधकामास सुरवात होणार असल्याचे नगरपरिषदेचे शहर अभियंता हुमने यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित एच. मेश्राम, उपजिल्हा संघटक जगदीश त्रिभुवनकर, युवासेनेचे जिल्हा समन्वयक मनोज चौबे, उपतालुका प्रमुख संतोष पाठक, निखील कटारे, दीपक मलेवार, शुभम कारेमोरे, सागर बिसने, उमाकांत बडवाईक, चंद्रभान लांजेवार, अतुल बडगे, संजय बडवाईक, अश्विन खोब्रागडे, हितेश मेहर, विजय खंडाते उपस्थित होते.