मा.ना.नवाब मलिक यांच्यावरील केलेली कार्यवाही सूडबुद्धीतुन
✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱
लाखणी /भंडारा:-राज्यांचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने बुधवारी अटक केली. मलिक यांच्या अटकेचा भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे निषेध करण्यात आला.त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून केंद्र सरकार विरोधात घोषणा देऊन मा.नरेंद्रजी मोदी पंतप्रधान भारत सरकार यांना जिल्हाधिकारी भंडारा मार्फत निवेदन देण्यात आले.
केंद्रातील भाजप सरकार कडून देशात अराजकता माजविली जात आहे. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे मंत्री नवाब मालिक यांनी वेळोवेळी पत्रकार परिषद घेऊन व सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्रातील भाजप सरकारचा चेहरा उघड केला. त्याचाच बदला घेण्यासाठी केंद्र सरकारने तथ्ये नसलेली जुनी प्रकरणे बाहेर काढून ईडीच्या माध्यमातून अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक केली. हा सर्व प्रकार म्हणजे सत्याचे तोंड दाबण्याचा प्रयत्न होय.या घटनेचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फ मोर्चा काढण्यात आला त्या वेळी मोर्चात प्रदेश महासचिव श्री.
धनंजय दलाल,ॲड विनयमोहनपशीने माजी नगराध्यक्ष, नरेंद्र झंझाड तालुका अध्यक्ष भंडारा ,डॉ.रविंद्र वानखेडे जिल्हा अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग, प्रभात गुप्ता जेष्ठ नेते,युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यशवंत सोनकुसरे, गंगाधर डोंगरे,रजनिश बनसोड, लोकेश खोब्रागडे, अमर उजवने, राजू पटेल, शहजादा भाई, आशा डोरले, किर्ती गणविर, राहुल दादा निर्वाण ,अज्ञान राघोर्ते, प्रभू फेंडर ,हितेश सेलोकर, राजेश वासनिक, प्रभाकर बोदेले, गणेश चवधरी, रवि लक्षणे, डॉ विश्वजीत थुलकर, गजानन बादशहा, सुभाष तांडेकर, दयानंद नखाते ,आशिष दलाल, शरद मेश्राम, निशांत बुरडे, मयुरेश पंचबुधे, राहुल पिकलमुंडे, शुभम बागडे, लोकेश नगरे, अश्विन बांगडकर, शेखर गभने, अरुण अंबादे, गणेश बानेवार, विक्कि रावलानी, मंगेश रेहपाडे, विकेश मेश्राम, शाहरुख खान, अमन मेश्राम, इकबाल खान, रियाज़ आली, सुनील शहारे, शब्बीर, गुड्ड हेडाउ, नागेश भगत, अनिल कळंबे, चेतन माकडे, चेतन वैरागडे, ललित बिसेन, राजेश डोरले, रविंद्रकुमार तिडके,व फार मोठ्या संख्येने राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी चे कार्यकारी उपस्थित होते.