सर्वसामान्याची राजकीय दुर्लक्षता , जनमानसाचे हक्क हिरावुन घेऊन जाणार :अश्विन मेश्राम वंचित बहुजन आघाड़ी

59

सर्वसामान्याची राजकीय दुर्लक्षता , जनमानसाचे हक्क हिरावुन घेऊन जाणार :अश्विन मेश्राम वंचित बहुजन आघाड़ी

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱

लाखणी/नागभीड:- आंबेडकरवादी संविधान समर्थकांनी , चळवळीच्या कार्यकर्त्यानी , स्वाभिमान जागा ठेवीत वेळीच जागृक व्हावे स्वताला सेक्युलर भासवित जनतेची दिशाभुल करीत ६० वर्ष राजकीय उपभोग घेणारे संविधानात्मक संघरचनेवर फेरविचार करण्याची भाषा वापरुन संविधानावर फेरविचार करण्यासाठी राजकीय पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरु केलेला आहे आणि रक्तात व्यापार आहे असे ठासुन बोलणा-यांनी खाजगीकरण करीत देश विकायला काढला आहे.

ती वेळ दुर नाही की देश हा उद्योगपती च्या घशात जाईल त्यावेळी जनमानसां जवळ माझ हक्काच म्हणायची वेळ निघुन जाणार .त्यामुळे सर्वसामान्यांनी राजकीय दुर्लक्षता दुर सारीत वेळीच जागृक व्हावे*

आमदार , खासदार , निवडणुक आली की आजतागायत प्रस्थापित पक्षातील उम्मेदवाराला मिक्सर वाटप , कधी साड्या वाटप इ.पाच वर्षातुंन एकदाच बहीनीची का आठवन येते त्यात ही ३० रु ची साडी भेट देऊन त्यांच्या नव-यांची लायकी दाखवली जाते.

सर्वसामान्याची राजकीय दुर्लक्षता , जनमानसाचे हक्क हिरावुन घेऊन जाणार :अश्विन मेश्राम वंचित बहुजन आघाड़ीजनतेची कामे बरोबर केली तर या गोष्टी ची गरज भासली नसती हे आमदार खासदारांना माहीत असतांना मतदार म्हणुन नागरिकांनी डोळे झाक करने हे लोकशाहीला मारक आहे

दगडापेक्षा विट मऊ म्हणा-यानी हे लक्षात घेतले पाहीजे डोक दोन्ही वस्तु ने फुटणार आहे रक्त दोन्ही बाजुने निघणार असेल तर यांना दुर सारलेले कधीही चांगले असेल वर्षातुन संपुर्ण दिवस स्वताच्या भरवश्यावर जिवन जगतांना निवडणुकीच्या दिवशी स्वताच्या स्वाभिमानाला विकायची गरज का पडते याच विचार मतदार म्हणुन करावा लागेल व आजपावेतो सत्तेत असलेल्या पक्षाला धुडकावुन सत्ता बदल करने गरजेचे आहे.

ज्यामुळे मतदारांच्या मतांच महत्व कळेल आणि सत्तेत असलेली पक्ष लोकहीताचे कामे करतील त्यामुळे येणा-या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जि . प ,प . स , नगरपरिषद , नगरपालिका , महापालिका निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाड़ी पक्षाला विजयी करीत आजपावेतो सर्वसामान्याचा हिताचा विचार न करता सत्तेचा उपभोग घेणा-यांना सत्तेच्या बाहेर करावे असे आवाहन चंद्रपुर जिल्हा वंचित बहुजन आघाड़ी कार्यकारणी सचिव अश्विन मेश्राम यांनी केले.

https://www.instagram.com/p/CaUnjDSqn12/

 

हे आपण वाचलंत का?