मूल शहर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे केंद्र सरकारचा विरोधात जाहीर निषेध
हस्तक वाळके
मूल तालुका प्रतिनिधि
राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा महाराष्ट्र सरकारचे अल्पसंख्याक मंत्री मा.ना.नवाब मलिक साहेब गेल्या काही महीन्यापासून केंद्र सरकारचे आणि भाजप नेत्यांनी केलेले घोटाळे बाहेर काढत होते त्यामुळे केंद्र सरकार च्या सान्निध्यात असलेली ई. डी विभागाने काल अचानक त्यांच्या घरी जाऊन कोणत्याही प्रकारे नोटीस न देता त्यांच्या घरी जाऊन धाड टाकली व कोणतेही पुरावे नसतांना त्यांना अटक करून महाराष्ट्रात राजकीय अराजकता माजवण्याच्या प्रयत्न केला ! ह्याच विषयाला अनुसरून राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य ह्यांच्या सूचनेनुसार निषेध करण्याकरीता गांधी चौक मूल येथे दिनांक २५ -०२-२०२२ रोजी
शुक्रवारला दुपारी १२.०० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुमीत सुरेशराव समर्थ ह्यांच्या नेतृत्वात मूल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे जाहीर निषेध आंदोलन केंद्र सरकारच्या विरोधात करण्यात आले !
सदर निषेध आदोनलनात प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुमीत समर्थ, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते निपचंद शेरकी, तालुका अध्यक्ष प्रा.किसन वासाडे, शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे, तालुका महिला अध्यक्ष निताताई गेडाम ,महिला शहर अध्यक्ष सौ अर्चना चावरे, तालुका युवक अध्यक्ष समीर अल्लुरवार,शहर कार्याध्यक्ष महेश जेंगठे , उपसरपंच अशोक मार्गनवार, उपस्थित होते !,
निषेध आंदोलन सुरूवात करण्याआधी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी ह्यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून आंदोलनाची सुरवात करण्यात आली !
केंद्र सरकारच्या विरोधात निषेध म्हणून नारे लावण्यात आले व उपस्थित प्रमुख पदधिकार्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात सदर विषयावर भाषणेबाजी करण्यात आली !
सदर निषेध आंदोलन यशस्वी होण्याकरिता रेहाना शेख, रफिक शेख, नासीरभाई पठाण, दुशांत महाडोळे, शहर सचिव प्रदीप देशमुख , सतीश गुरनुले , संदेश भोयर, तालुका महासचिव ज्ञानेश्वर वाघमारे,नंदू बारस्कर संजय ठाकरे, इंद्रापाल पुणेकर, अक्षय वाकडे, अजय कटलावार,मारोती शेंडे , नीता रायपुरे , ज्योती मेश्राम, विमल गेडाम ,तौसिफ पठाण , सिंचन दुधे, चिराग झाडे, नीरज तुपकर आदी कार्यकर्त्यांनी कथक परिश्रम केले