न. प. ब्रम्हपुरी अंतर्गत वृक्ष लागवड कंत्राटात लाखोचा घोटाळा..! वंचित बहुजन आघाडी कडून मुख्याधिकारी ब्रम्हपुरी यांच्याकडे तक्रार दाखल

57

न. प. ब्रम्हपुरी अंतर्गत वृक्ष लागवड कंत्राटात लाखोचा घोटाळा..!

वंचित बहुजन आघाडी कडून मुख्याधिकारी ब्रम्हपुरी यांच्याकडे तक्रार दाखल

न. प. ब्रम्हपुरी अंतर्गत वृक्ष लागवड कंत्राटात लाखोचा घोटाळा..! वंचित बहुजन आघाडी कडून मुख्याधिकारी ब्रम्हपुरी यांच्याकडे तक्रार दाखल

✍क्रिष्णा वैद्य✍
चंद्रपूर जिल्हा विशेष प्रतिनिधी
9545462500

ब्रम्हपुरी :- नगरपरिषद क्षेत्रात निरनिराळ्या ठिकाणी लोकोपयोगी वृक्ष लावणे व जतन करण्याचे कंत्राट रोशन व्यंकट नाकतोडे कंत्राटदार यांची सि. एस. आर. दरापेक्षा 0.01% कमी दराची निविदा प्राप्त झाल्याने अंदाजपत्रकीय रक्कम 42,94,004 /- रुपयाचे या कामाचे कार्यादेश नगरपरिषद तर्फे २६ जून २०१८ मध्ये रोशन नाकतोडे यांना देण्यात आले. करारनाम्या नुसार वृक्ष लागवड पासून दोन वर्षे पर्यंत वृक्ष देखभाल व जतन नियंत्रण करिता आवश्यक कारवाई करून शंभर टक्के वृक्ष जतन करणे बंधनकारक ठरविण्यात आले होते. तर लोकोपयोगी 15 हजार झाडे नगरपरिषद क्षेत्रात लावतांना संबंधित प्रभागाचे नगरसेवक यांना वृक्षलागवड कार्यक्रमात सहभागी करून घेतं फोटोसेशन करत संपूर्ण वृक्ष लागवड बंधनकारक राहील असे कंत्राटदाराशी झालेल्या करारनाम्यानुसार ठरले होते.

४२,९४,००४ रकमेच्या या कंत्राटा मध्ये शहराला निवडक दोन ते चार हजार झाडं लाभले तर त्यातील काहीच निवडक झाडं आज घडीला जिवंत असल्याचे बघायला मिळत आहेत तर त्या कालावधी दरम्यान कुठल्याच प्रभागामध्ये नगरसेवकांच्या उपस्थितीत एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडे लावले गेल्याचे शहरवासियां तर्फे नाकरण्यात येत आहे व सर्व योजना कागदावर कार्यान्वयित होती असे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे कंत्राटदाराने शासनाच्या पैशाला चुना लावत उधळपट्टी करणाऱ्या या योजनेची व संबंधित कंत्राटदाराची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी तक्रार वंचित बहुजन आघाडी ब्रम्हपुरीने मुख्याधिकारी ब्रम्हपुरी यांना करून दोषीवर कारवाई करा अन्यथा वंचित बहुजन आघाडी ब्रम्हपुरी तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी तक्रार देण्यात आली. सदर तक्रार/निवेदन देतांना डॉक्टर प्रेमलाल मेश्राम, लीलाधरजी वंजारी,अनिल कांबळे, अश्वजीत हुमणे, संतोष फुले, शाहिद खान,धनपाल मेश्राम, कमलेश मेश्राम, डी.एम रामटेके आणि महिला आघाडीच्या मनीषा उमक व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते