पालांदूर विकास निधीच्या पोकळ गर्जनाच ठरणार काय?
✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱
लाखनी :-तालुक्यातील पालांदूर हे गाव परीसरातील ४० गावाचे केंद्रबिंदू असून येथील नागरिकांना दिवसेंदिवस अनेक समस्यांना तोंड देत जावे लागते . पालांदूर हे गाव तालुक्याचे ठिकाण नसेल तरी मीनी तहसील म्हणून ओळखले जाते.पालांदूर परिसराच्या विकासासाठी निधी मंजूर झाल्याच्या बातम्या सन २०२१ पासून एका वृत्त पत्रात झळकत आहेत पण प्रतेक्षकामाला सुरूवात झाली नसल्याने गावात मोठी चर्चा रंगीली आहे.मागील वर्षीपासून मंजूर झालेल्या निधीचे काय?हा निधी गेला कुठे? पोकळ आश्वासन आहेत की काय असा प्रश्न नागरिक करित आहेत.निधी मंजूर झाल्याच्या एक नाही अनेक बातम्या प्रकाशित झाल्या त्यामध्ये १४आॕक्टोबरला २० ला पालांदूर गोंडेगाव रस्त्याला आधार ९ लाखाचा निधी,दि.१४ मार्च २१ला बायपास रस्त्यासाठी अडीच कोटी मंजूर ,पालांदूर शहरातील वाहतुकीची समस्या सुटणार,१५फेब्रुबारी २२ला पालांदुर येथील शवविच्छेदन गृहासाठी ३० लाखाचे नियोजन ,पालांदूर वाकल रस्त्याला ४.७५ कोटीचा निधी अशा आसयाचे वृत्त प्रकाशित झाले.पण प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याशिवाय खरे नाही.लबाडाच आमंत्रण ,जेवल्याशिवाय खरं नाही असा सुर येथील जनता काढीत आहे.ख-या अर्थाने लोकप्रतिनिधींनी व प्रशासनाने समस्या ओळखून विकास कामाला सुरुवात करावी.
बायपाससाठी अनेक खासदार आमदारांनी आश्वासने दिली पण आस्वासन खोटे ठरले आहेत.बायपास नसल्याने बाहेरगावी जाण्यासाठी गावातील मुख्य रस्त्याचा वापर होत आहे.त्यामुळे अनेक अडचणींना सामना करावा लागतो.अनेकदा अपघातही झाले आहेत.
ग्रामीण भागातील रस्यांची दुरावस्था पाहवत नाही.रस्तात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.मागील अनेक दिवसापासून देवरी गोंदी ते वाकल आणि वाकल ते हरदोली हा रस्ता रहदारी योग्य राहिलेला नाही.हीच परिस्थिती वाकल ते पालांदूर ,नवीन म-हेगाव ते जुना म-हेगाव,पाथरी लोहारा व खराशी या गावांना जोडणा-या रस्याची दयनीय अवस्था झाली आहे.
पालांदूर येथे अद्ययावत ग्रामीण रुग्णालय ,वैद्यकीय अधिकारी तथा सर्व सोयी सुविधा उपलब्ध असतांना अपघाती मृत्यू झाल्यास उत्तरीय परिक्षणाकरिता लाखनी अथवा उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे नातेवाईकांना मृतदेह न्यावा लागतो .त्यामुळे गरिबांना नाहक आर्थिक भुर्दंडासह त्रास सहन करावा लागतो.ही बाब लोकप्रतिनिधींना व सामाजिक कार्यकर्त्यांना माहित असून कसलेही प्रयत्न केले जात नाही.पालांदूर येथे शव विच्छेदन गृह करण्याची मागणी जनतेकडून केली जात आहे.पेपरबाजीत धन्यता माणून घेण्यापेक्ष्या विकासाला महत्व देणे गरजेचे ठरणार .