कुणीतरी घर मिळवून द्या हो! वयोवृद्ध मधू मेश्राम चा टाहो: घरकुलासाठी शासन दरबारी मारतोय चकरा

कुणीतरी घर मिळवून द्या हो!

वयोवृद्ध मधू मेश्राम यांचा टाहो: घरकुलासाठी शासन दरबारी मारतोय चकरा

कुणीतरी घर मिळवून द्या हो! वयोवृद्ध मधू मेश्राम चा टाहो: घरकुलासाठी शासन दरबारी मारतोय चकरा

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱

लाखणी:-प्रत्येकाला आपले स्वतः चे घर असावे,असे वाटते…. त्यासाठी ते धडपडही करतात…. मात्र, परिस्थितीपुढे गरिबांना हतबल व्हावे लागते….
“प्रत्येकाला मिळेल घर हे केंद्र शासनाचे ब्रीद वाक्य आहे आणि पंतप्रधान आवास योजनेंतर्गत प्रवर्ग *”ड”* च्या माध्यमातुन प्रत्येक गरीब कुटुंबाला घरकुलाचा लाभ मिळणार असल्याने नागरीकांना दिलासा मिळाला होता. मात्र केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेलाच आता ग्रहण लागले असल्याचे दिसून येत आहे. अनेक गरीब कुटुंबे कित्येक वर्षानंतरही या योजनेपासून वंचित राहिले आहेत.

घरकुला अभावी अशीच काहीशी दयनीय अवस्था लाखणी तालुक्यातील पालांदुर(चौ) येथील लोहार मोहल्ल्यातील जन्मापासून रहिवासी असलेल्या वयोवृद्ध मधू हरी मेश्राम व त्याच्या कुटुंबीयांची झाली आहे. सततच्या पावसामुळे घराच्या आतील भिंती कोसळल्यामुळे त्याचा संसार उघड्यावर आला आहे.
मधूने कित्येकदा अर्ज व विनवण्या करूनही कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अर्ज व विनवण्यांना केराची टोपली दाखवल्यामुळे मेश्राम कुटुंबीय अजूनही घरकुलाच्या प्रतीक्षेत आहे.

मधु मेश्राम यांचेकडे वडिलोपार्जित असेलल्या शेतीपैकी पाव-अर्धा एकर शेतजमीन असून नसल्यासारखी जेमतेम कोरडवाहूशेती शेती आहे.
तीही शेती पिकत नाही.मोलमजुरी करून ते वर्षभर कसाबसा अपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. घर बांधण्यासाठीदेखिल पैसे नाहीत. मागील पंधरा ते वीस वर्षांपासून ते घरकुलाच्या प्रतीक्षेत आहेत.
सद्या ते राहत असलेले घर पूर्णतः जीर्ण झाले असून घराच्या भिंती पडल्या असून *”कुणी घर देता का, घर”?* असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

पावसाळ्यात जिथे तिथे पावसाचे पाणी गळते. त्यामूळे घर अचानक कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामूळे मिळेल त्या घरकुल योजनेतून घरकुलाचा लाभ मिळेल या आशेने ते सरपंच, उपसरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य इत्यादीकडे ते येरझऱ्या मारून विनवण्या करून आपबिती सांगितली मात्र आजपर्यंत कुणीही निराकरण केलेले नाही. सर्वांनी त्यांना डावलण्याचाच प्रकार केलेला आहे.

लोकप्रतिनिधींनी प्रलोभने,आश्वासने आणि प्रशासनाच्या उदासिनतेचे वार झेलून मागिल पंधरा वीस वर्षांपासून मधु हरी मेश्राम व त्यांच्या कुटुंबीयांचा संसार उघड्यावरच सूरु असल्याचे दिसते.
प्रत्येक वेळेला अपयशच पदरी पडत असून अद्याप मधुच्या प्रयत्नांना यश आले नसल्याने मधु मेश्राम यांच्या घरकुल मिळण्याच्या प्रयत्नांना यश मिळो बस्स एवढंच!

आज गरिबांचा कुणी वाली नाही. गरीब कुटुंबात जन्माला येणं हा फार मोठा अपराध आहे.मतदान आले की तुमचे अच्छे दिन येणार म्हणून सांगतात.तसं कधी कधी घडतच नाही. मग आता आमचा कुटुंब उद्ध्वस्त झाल्यावरच घरकुल मिळणार काय? अशा प्रश्न मधु मेश्राम यांना भेडसावत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here