संत शिरोमणी संत रोहिदास महाराज यांची ६४७ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी
✍️संतोष उध्दरकर. ✍️
म्हसळा तालुका प्रतिनिधी
📞७८७५८७१७७१📞
म्हसळा :- स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाची शिकवण देणारे महान जगद्गुरू संत शिरोमणी संत रोहिदास महाराज यांची जयंती २४ फेब्रुवारी रोजी म्हसळा शहरातील रोहिदास नगर येथे समाज मंदिरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, जयंतीनिमित्त समाज बांधव यांच्या वतीने संत शिरोमणी संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले, नंतर महाराज यांची महाआरती करण्यात आली तसेच दुपारी महाप्रसाद व सायंकाळी लहान मुलांच्या साठी विविध प्रकारच्या स्पर्धा व सांघिक खेळ तसेच विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण व आलेल्या मान्यवरांचे स्वागत अशा , भरघोस कार्यक्रमाचे आयोजन करुन सर्व समाज बांधवांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला यावेळी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व समाज बांधव व महिला मंडळ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. तसेच कार्यक्रमात शहरातील अनेक मान्यवरांनी देखील उपस्थिती दर्शविली.