नागाळा येथील अवैध कोलडेपो बंद करा
महिला काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून मागणी
🖋️ साहिल सैय्यद..
घुग्घूस तालुका प्रतिनिधि
📲 9307948197
घुग्घूस : पडोली मार्गावर नागाळा,महाकुर्ला परिसरात जवळपास 23 अवैध कोलडेपो असून या कोलडेपोच्या प्रदूषणाने शेतकरी विद्यार्थी व रस्त्याने जाणारे दुचाकी स्वार नागरिकांना जीवघेणा त्रास होत असल्याने जिल्हा महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद, महिला शहर काँग्रेस कार्याध्यक्ष दिप्ती सोनटक्के सुजाता सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप – प्रादेशिक अधिकाऱ्यांना निवेदन देऊन कोलडेपोवर कारवाईची मागणी करण्यात आली.
या कोलडेपोमुळे होणाऱ्या प्रदूषणाची दखल घेऊन तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी आगस्ट – सप्टेंबर 2019 च्या दरम्यान हे कोलडेपो बंद करण्याचे आदेश दिले होते
18 नोव्हेंबर 2019 रोजी या डेपोवर न्यायालयीन खटले भरण्याचे आदेश ही देण्यात आले होते मात्र काही काळासाठी हे डेपो बंद करून परत शुरु करण्यात आलेले आहे.
या कोलडेपो मध्ये गडचांदूर येथील कवठाळा भोयगाव परिसरात ए का भंगार व्यवसायिका तर्फे कोळसा खाणीतुन विविध उद्योगात जाणारा कोळसा चालकांच्या संगनमताने (चोरीने)विकत घेवून त्याला शेत परिसरात साठवून कोलडेपोत विकल्या जातो या कोलडेपो मध्ये जिल्ह्यातील विविध उद्योगात जाणाऱ्या चांगल्या दर्जाच्या कोळश्याला खाली करून निकृष्ट दर्जाचे कोळसा वाहनात भरून उद्योगांना पाठविल्या जाते व चांगला कोळसा उमरेड तेलंगणा या परिसरातील वीट भट्ट्याना विकल्या जातो.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोलडेपोना नेमून दिलेल्या नियमांचे सतत उल्लंघन करून शासनाची दिशाभूल केली जात आहे व नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करण्यात येत आहे.
नियम
कोलडेपो परिसरात वृक्षारोपण करण्यात यावी.
कोलडेपो परिसरात तीन मिटर उंचीची संरक्षक भिंत उभारण्यात यावे व कोलडेपो मधील कोळश्याचे ढिगारे हे या सुरक्षभिंती पासून उंच नसावे.
जमिनीच्या खालील पाणी प्रदूषित होऊ नये याकरिता जिमनीवर फ्लोरिंग करण्यात यावे.
कोलडेपो परिसरात प्रदूषणाची सतत माहिती देणारे यंत्र बसविण्यात यावे
हवेची योग्य दिशा जाणूनच कोलडेपो उभारण्यात यावे या नियमांचे सतत उल्लंघन करण्यात येत आहे.
मात्र नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या जीवनाशी खेळण्याचा प्रयत्न बंद न झाल्यास महिला काँग्रेस तर्फे तीव्र आंदोलन छेळण्याचा इशारा यास्मिन सैय्यद यांनी दिले