संत शिरोमणी रोहीदास महाराज यांचा ६४७ वा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

56
संत शिरोमणी रोहीदास महाराज यांचा ६४७ वा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

संत शिरोमणी रोहीदास महाराज यांचा ६४७ वा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

संत शिरोमणी रोहीदास महाराज यांचा ६४७ वा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

नंदकुमार चांदोरकर
माणगाव तालुका प्रतिनिधी
8983248048

माणगांव :- दि २४/०२/२०२४ रोजी पूरार येथे सामाजिक क्रांतीचे प्रणेते थोर समाजसुधारक महापुरुष आराध्य दैवत संत शिरोमणी गुरु रोहीदास महाराज यांची जयंती संत रोहिदास विकास मंडळ, समाज मंदिर पुरार येथे संपन्न झाली.
सदर कार्यक्रम राकेश गोरेगावकर यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आले.
मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सर्व पदाधिकारी आणि समाजातील सर्व समाज बांधव आणि भगिनी यांच्या प्रचंड उपस्थितीत महाराजांची जयंती उत्साहात जल्लोषात साजरी करण्यात आली. संत शिरोमणी गुरु रोहीदास महाराज यांना समाजातील अनेक सर्व समाज बांधव, युवा वर्ग व महिला मंडळीं यांच्या समवेत प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते प्रथम दिप प्रज्वन करून संत शिरोमणी रोहीदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पमाळ अर्पण करून विनम्र अभिवादन केले. व स्वागत गीत घेण्यात आले.

सूत्र संचालनाची धुरा स्थानिक मंडळाचे अध्यक्ष नितेश पुरारकर यांनी अगदी शेवट पर्यंत सांभाळली. प्रथम जयंतीस आलेल्या सर्व बांधवांचे स्वागत करून आभार मानण्यात आले. मंडळाचे सचिव मंगेश पुरारकर यांनी प्रस्तावना केली.

तसेच प्रमख पाहुणे म्हणून परमेश्वर गाडे सर (कोल्हापूर ) महेंद्र जळगावकर सर (दापोली) तसेच विलास गोरेगावकर सर (गोरेगाव) यांनी समाज प्रबोधनात्मक संत रोहीदास महाराज यांच्या जीवनावर आपले अमूल्य विचार व्यक्त करून सर्वांना मार्गदर्शन केले. तसेच शालेय स्थरावर उत्तम प्रकारे प्रवण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा संपन्न झाला.
त्या क्षणी रोहीदास विकास मंडळ पुरार् अध्यक्ष नितेश पुरार, उपाध्यक्ष राकेश गोरेगावकर, सचिव मंगेश पुरारकर, सहसचिव विशाल पुरारकर खजिनदार विशाल पुरारकर, सहखजिनदार अनिता बिरवाडकर, कायदेशीर सल्लागार ॲड.तुषार बिरवाडकर, राष्ट्रीय महासंघ सम्पर्क प्रमुख रायगड महेश गोरेगावकर ,माणगाव तालुका कार्यकारिणी सदर कार्यक्रमास हजर होते, तसेच स्थानिक मंडळाचे युवा तसेच पंचक्रोशीतील नागरिक बहु संख्येने हजर होते.