माणगांव तालुक्यातील दहिवली येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी..
✍️ दिलीप करकरे ✍️
मुंबई प्रतिनिधी
📞७२०८७०८४५६📞
मुंबई : आज दिनांक १९/०२/२०२५ रोजी रा.जि.प. शाळा दहिवली मराठी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. श्रध्दा अंबुर्ले मॅडम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले .त्यानंतर रा. जि. प. शाळेतून संपुर्ण गावात शिवजयंती मिरवणूक काढण्यात आली.
शाळेतील विद्यार्थ्यांना गावातील प्रत्येक चौकात समूहगीत , समुह नृत्य, भाषण, पोवाडे, लेझीम नृत्य,सादर केले संपूर्ण गावा परिसरात घोषणा देण्यात आल्या.या उपक्रमात शाळेतील विद्यार्थी व पारंपारीक वेशभूषा करून सहभागी झाले होते. कुमार श्रेयस करकरे याने छत्रपती शिवाजी राजे तर कुमार सर्वेश करकरे याने बालशिवाजीची वेशभूषा केली होती.सदर मिरवणुकीत गावचे पोलिस पाटील मा.श्री. चंद्रकांत चेरफले , SMC .चे अध्यक्ष श्री जयेंद्र सत्वे , उपाध्यक्ष श्री. शैलेश करकरे, मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री सुरेंद्र सुतार, माजी सरपंच श्री बाबू लाखाडे,ग्रा. पं. सदस्या सौ. रिया लाखाडे, मुंबई मंडळाचे माजी अध्यक्ष श्री सुरेश करकरे,श्री . तुकाराम लाखाडे, श्री . राजेंद्र दाभणे,श्री. नितेश दाभणे, तसेच गावातील मान्यवर ग्रामस्थ, महिला मंडळ सदस्या, युवक मंडळ, माजी विद्यार्थी , शाळेतील शिक्षकवृंद सहभागी झाले होते सामुदायिक लेझीम नृत्याने मिरवणुकीची सांगता करण्यात आली .