पंतप्रधान ग्रामीण आवास योजने अंतर्गतपंचायत समिती भिवापूर येथे घरकुल वाटप
त्रिशा राऊत नागपुर क्राइम रिपोर्टर.
मो 9096817953
भिवापूर :- भिवापुर.आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात प्रत्येक गरजूंना स्वतःचे घर म्हणजेच पंतप्रधान ग्रामीण आवास योजने अंतर्गत
पंचायत समिती भिवापूर येथे घरकुल वाटप करण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा क्रमांक. 2 अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना त्यांचे हक्काचे घर मिळावे यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या योजनेअंतर्गत मंजूर लाभार्थ्यांना आमदार संजय मेश्राम यांच्या हस्ते मंजुरी पत्र आणि प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे गरजू कुटुंबांना सुरक्षित आणि सन्मानपूर्वक निवास
मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.