शहरी विभागात ऊषा वर्करची नेमणुक करा, महीला बि.एल.ओ. चे मुख्याधिकार्‍यांना निवेदन.

Appoint Usha Worker in Urban Division, Women B.L.O. Statement to the Chief Minister.
Appoint Usha Worker in Urban Division, Women B.L.O. Statement to the Chief Minister.

युवराज मेश्राम नागपुर प्रतीनिधी
नागपुर:- राष्‍ट्रीय  ग्रामीण आरोग्य अभियान, राज्य निवडणुक आयोग, तसेच पंचायत समीती, जिल्हा परीषदेअंतर्गत येणारे विवीध कामे ही ग्रामपंचायतीच्या गावातील आशावर्करच्या माध्यमाने मानधन स्वरूपात केल्या जाते, त्याचप्रमाणे शहरी विभागातही प्राधान्याने उषा वर्करची नेमनुक करून व शासनाने तसा जिआर काढून काहीअंशी शहरी विभागातील महीलांना रोजगार देण्याची मागणी नुकतीच एका निवेदनाद्वारे मोवाड न.प. मुख्याधिकारी पल्लवी राऊत तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. संजय सोळंकी यांना नुकतेच देण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी प्रा. आ. केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ. अनिता क्षिरसागर, औषध विभाग प्रमुख श्रि. डीवटे सर, तसेच आरोग्य कर्मचारी गोलु क्षिरसागर हे यावेळी प्रामुख्याने ऊपस्थीत होते.

नरखेड तालुक्यात जि. प. व न.प. चे प्राथमिक शिक्षक वगळता अंगणवाडी सेवीका, मदतनीस, तसेच आशा कार्यकर्त्यासह मोवाड व नरखेड येथील जवळपास २५ सर्वसाधारण महीलांची तीन वर्षापुर्वी निवडणुक विभाग नरखेडच्या वतीने केंद्रस्तर अधिकारी ( बि.एल.ओ.) म्हणुन नेमणुक केली होती. त्या महीलांकडुन मतदान फाॅर्म भरणे, घरोघरी जाऊन आपल्या प्रभागातील मतदारांची नोंद करणे, मय्यत स्थलांतरीताचा आढावा घेऊन तो स्वखर्चाने तालुक्याला नेऊन देणे, निवडणुक विभागाच्या सभेला वेळोवेळी ऊपस्थीत राहणे, मतदार ओळखपत्र घरपोच देणे, याव्यतीरीक्त इतरही कामे या महीलांकडुन तुटपूंज्या मानधनावर वर्षभर करण्यात येते. सलग तिन वर्षापासुन महीलांचे मानधन मीळाले नसुन व कोरोना लाॅकडाऊनच्या भितीमुळे त्यांच्या हाताला कामे नसल्याने त्यांचेवर आता ऊपासमारीची वेळ आली आहे. या सर्वसाधारण महीलांना आशा वर्करप्रमाणे उषा वर्करचा दर्जा देऊन शासनाने तशी तरतुद करून जिआर तयार करावा अशी मागणी आता शहरातील महीलाकडुन करण्यात येत आहे.

Appoint Usha Worker in Urban Division, Women B.L.O. Statement to the Chief Minister.

ग्रामपंचायतीच्या गावातील आशा वर्करप्रमाणे शहरी महीलांनाही प्राधान्यक्रमाने उषा वर्करचा दर्जा देऊन त्यांची त्यापदी नेमणुक करण्यात यावी जेणेकरून त्यांना रोजगार उपलब्ध होउन आपला व प्रपंचाचा ऊदरनिर्वाह करू शकेल. या आशयाचे निवेदन मोवाड नगरपरीषदेच्या मुख्याधिकारी पल्लवी राउत तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. संजय सोळंकी यांना नुकतेच देण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी मोवाड येथील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी कांताबाई बालपांडे, सुधा सिसोदीया, प्रतिभा हेडाऊ, अनामीका निकोसे, अनीसा शेख, नमीता खेरडे, तसेच सौ. लिना ढोके यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थीती होती. सदर बि.एल.ओ. महीलांच्या उषा कार्यकर्ता नेमणुकीसाठी शासनस्तरावर विशेष नोंद घेतली जाईल असे आश्वासन डाॅ. संजय सोळंकी तसेच मुख्याधिकारी पल्लवी राउत यांनी सदर महीलांना दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here