गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केलेले राज्यातील महत्त्वाचे प्रकल्प....

आमदारांना मुंबईतमध्ये घर देण्याच्या वादग्रस्त निर्णयावर जितेंद्र आव्हाड यांनी दिले स्पष्टीकरण

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केलेले राज्यातील महत्त्वाचे प्रकल्प….

मनोज कांबळे
२५ मार्च, मुंबई: महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये सध्या २०२२ वर्षाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. या दरम्यान गृहनिर्माण मंत्री यांनी सभागृहात केलेल्या आपल्या भाषणात गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी १६ महत्त्वाचे मुद्दे मांडले. या मुद्द्यांद्वारा महाराष्ट्राच्या गृहनिर्माण मंत्रालयाकडून राबवण्यात येणाऱ्या अनेक योजनांची आणि भविष्यात सुरु केल्या जाणाऱ्या नवीन प्रकल्पांची मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माहिती दिली. मुंबईतील कोळी समाज, ते कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या महिला, गावपातळीवर म्हाडाची उपस्थिती ते नवीन रुग्णालये यांसारख्या अनेक प्रकल्पांचा यात समावेश होता. 

आपल्या भाषणाची सुरुवात जितेंद्र आव्हाड यांनी खात्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या काकाचे कौतुक करत केली. गेल्या दहा वर्षात जेवढे प्रकल्प मार्गी लावण्यात आले नाहीत, तेवढे प्रकल्प कोरोनाकाळातील दोन वर्षात मार्गी लावल्याचे त्यांनी आपल्या भाषणात केले. सभागृहातील भाषणात त्यांनी मांडलेले काही महत्त्वाचे मुद्दे: 

बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या प्रकल्पाला सुरुवात केली गेली असून बीडीडी चाळींचे नामकरण होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. BDD वरळी ला स्व.बाळासाहेब ठाकरे नगर, BDD नायगांव ला आदरणीय शरदचंद्रजी पवार नगर, तर BDD नामजोशी चाळीला स्व.राजीव गांधी नगर असे नाव देण्यात येणार आहे.

पत्राचाळीचे नाव सिद्धार्थ नगर करण्यात आले.येथील 672 सदनिका धारकांना त्यांची हक्कांची घरे पुढील 2 वर्षात सुपूर्द करण्यासाठी गृहनिर्माण खाते या प्रकल्पाकडे जातीने लक्ष देईल.

कोकण दुर्घटनाग्रस्त तळीये गावासाठी 52 कोटींची तरतूद करण्यात आली असून,येथे बांधण्यात येणार घरे ही सोलर पॅनल,पाण्याची टाकी,पाण्याची टाकी आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग सुविधेसह सुसज्ज असतील.

 

जिजामाता नगर मुंबई येथे,मराठी विद्यार्थ्यांच्यासाठी हॉस्टेलची निर्मिती करण्यात येणार.
19 कोटी रुपयांची तरतूद असणारे हे हॉस्टेल 19 मजल्यांच असेल.ज्यात सर्व सुख सुविधा असतील.

वर्किंग वुमेन्स साठी 928 महिला राहू शकतील,अश्या हॉस्टेल ची निर्मिती 32 कोटीमध्ये ताडदेव येथे करण्यात येणार.हे हॉस्टेल मेडिकल फॅसिलिटी सह सुसज्ज असेल.

राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच शासन स्तरावर वृद्धाश्रमाची निर्मिती पालघर येथे करण्यात येणार. येथे नागरिकांना मिळणारी सुविधा या उच्चस्तरीय असणार आहे.

5625 चौ मी.क्षेत्रात जागतिक दर्जाचे वेटरनरी हॉस्पिटल लीलावती हॉस्पिटलच्या बाजूला उभे करण्यात येणार. जोगेश्वरी येथे देखील याच धर्तीवर 8859 चौ मी.वर जागतिक दर्जाचे हॉस्पिटल उभारणार.

पुण्यातील जुन्या झालेल्या म्हाडाच्या इमारतींचा देखील पुनर्विकास करणार. यात एकूण २६ लेआऊट आणि १३२ हेक्टर जमिनी म्हाडाच्या ताब्यात आहेत. यामुळे पुण्याच्या विकासाला हातभार लागेल.

गाव तिथे म्हाडा, ही योजना महाराष्ट्रभर राबवणार. वित्त विभागाकडून १०० कोटी रुपयांची तरतूद. महाराष्ट्राचे मृद व जलसंधारण मंत्री यांच्या मतदार संघातून या कामाची सुरुवात होणार.

चिरागनगर येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक SRA तर्फे उभारण्यात येणार.अण्णाभाऊ साठेंसारख्या थोर साहित्यिकांच स्मारक बनवण्याच भाग्य मला मिळत आहे,हि माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.

 

Annexure मध्ये भ्रष्टाचार होवू नये यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेत,मानवी हस्तक्षेप पूर्णपणे रोखला जाईल.तसेच संपूर्ण प्रणाली ही स्वयंचलित केल्याने भ्रष्टाचाराचा मुद्दाच याद्वारे नष्ट कायमचा निकालात निघेल.

SRA अंतर्गत असणाऱ्या झोपडी विक्रीची तरतूद १० वर्षावरुन ३ वर्षावर करण्यात आली.SRA अंतर्गत येणारी घरे आता फक्त अडीच लाखात देण्यात येतील.

 

मुंबईतील कोळीवाड्यांचे सीमांकन करण्यात येणार. कोळी बांधव हे येथील आद्य रहिवासी,त्यांच्यासाठी नवीन DCPR लागू करण्याचा निर्णय.

आमदारांना मुंबईत मिळणार मोफत घर..???

तसेच महाविकास आघाडी सरकारकडून आमदारांना मुंबई शहरामध्ये घरे देणार असल्याची घोषणा करणार आल्यात होती. या निर्णयाच्या विरोधात अनेकांनी आवाज उठवल्यानंतर हि घोषणा वादग्रस्त बनली होती. याबाबत स्पष्टीकरण देताना जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले कि, आमदारांना दिली जाणारी घरे हि मोफत नसतील. ह्या घरांसाठी लागणारी जागा आणि बांधकाम खर्च हा आमदारांकडून आकाराला जाणार आहे. त्याचा अंदाजे आकार सध्या ७० लाख रुपये इतका आहे.

https://www.instagram.com/p/CbPlZFmNnU1/

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here