अपंगाचे बनावट प्रमाणपत्र बनउन शासनाची फसवणूक करणाऱ्या कू. अर्पना रामदास लाटकर (पातकमवार) यांचे वर फौजदारी कारवाई करून सेवेतून बडतर्फ करावे.
✍ विनोद कोडापे✍
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
📱8380802959📱
गडचिरोली : -गडचिरोली जिल्ह्यामध्ये 100 अपंगाचे प्रमाणपत्र धारण करणाऱ्या पैकी 80 टक्के हे बोगस अपंग प्रमाणपत्र प्राप्त करणारे आहेत. आणि 20 टक्के हे मुड अपंग आहेत. त्यामुळे अपंगाचा मिळणार लाभ हे 80 टक्के बोगस प्रमाणपत्र करणारे हे शासनाची दिशाभूल करून लाभ घेत आहेत. याकडे शासनाचं लक्ष नाही.
तसेच या अश्या बोगस अपंग प्रमाणपत्रामध्ये बनावट अल्पदृष्टी अपंग प्रमाणपत्र बनउन शासनाच दिशाभूल करून शासनाची लाभ घेत असलेले कू.अर्पना रामदास लाटकर (पातकमवार) सहाय्यक प्रशासन अधिकारी पंचायत समिती गडचिरोली येते कार्यरत आहे. यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथून इथल्या काही डाक्टरांसोबत हितसंबंध जोपासून बनावट अल्पदृष्टी असल्याचा अपंग प्रमाणपत्र घेतले. व हाच प्रमाणपत्र परत दिनांक 28 डिसेंबर 2018 मध्ये पूर्णतपासणी करण्याकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात गडचिरोली येते दिले असता या प्रमाणपत्राची कोणतीही चौकशी किंवा माहिती न करता अर्पना रामदास लाटकर (पातकमवार) यांना traumaite keratinization (left eye) amblyopia हा आजार दाखवून 40 टक्के disability आहे असं हा प्रमाणपत्र वैद्य आहे. असा खोटा अल्पदृष्टी अपंग प्रमाणपत्र शासनाला दाखऊन शासनाची फसगत कु अर्पना रामदास लाटकर यांनी नोकरीचा व पदोन्नतीचा लाभ उचललेला आहे. कू अर्पना रामदास लाटकर यांनी जे बनावट अल्पदृष्टीअपंग प्रमाणपत्र शासनाला सादर केला आहे. तो प्रमाणपत्र अपंगवैक्ती अधिकार अधिनियम 1992/1995 व 2016 कायद्या नुसार नसून पूर्णपणे बनावट व खोटा अल्पदृष्टी अपंग प्रमाणपत्र आहे. तो प्रमाणपत्र या कायद्यामध्ये बसत नाही व वरील रोग असलेल्या वैक्तीना अपंग समजले जात नाही. कारण एक डोळा अंधत्व असेल व दुसरा डोळा अंधत्व नसेल व ते एक्या डोळ्याने लिहू शकते वाचू शकते आपले सर्व कामे करू शकते अश्या वैक्तीला अल्प दृष्टी अपंग समजले जात नाही. वरील दिलेल्या अपंगत्व कायद्यानुसार हे स्पष्ट दिसत आहे. आणि या सर्व बाबी कू.अर्पना रामदास लाटकर(पाताकमवर) यांच्यामध्येआहे.पण याकडे कोणत्याही अधिकाऱ्याचे लक्ष नाही.
कू.अर्पना रामदास लाटकर ( पातकमवर) यांनी हा खोटा अल्पदृष्टी अपंग प्रमाणपत्र सादर करून एखादी गरीब अपंग व्यक्तीची नुकसान केली आहे. व शासनाची खूप मोठ्या प्रमाणात फसगत केली आहे. व गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात अपंगत्वाची कोणतीही तपासणी न करता आपल्या मर्जीने अपंगाचे टक्के वाढउन प्रमाणपत्र देणे. असा प्रकार सुरू आहे. खोटा अल्पदृष्टी अपंग प्रमाणपत्र सादर करून शासनाची फसवणूक करणाऱ्या कू अर्पना रामदास लाटकर ( पातकमवार) यांचेवर व खोटे बनावट अपंग प्रमाणपत्र देणाऱ्या कमेटीवर या सर्व प्रकरणाची तातडीने चौकशी करून त्यांचेवर फौजदारी कारवाई करून सेवेतून बडतर्फ करण्यात यावे. जेणेकरून खऱ्या अपंग व्यक्तीना योग्य न्याय मिळेल व त्यांना शासनाच्या योजनेचा पुरेपूर लाभ मिळेल.