नागभीड नगरपरिषद क्षेत्रात 22 कुपनलिका मंजूर.
उन्हाळ्यात होणाऱ्या पाण्याची तीव्र टंचाई दुर होणारचं
*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधी*
*9403321731*
नागभिड : – नवीन नगरपरिषद सहाय्य योजनेच्या विशेष निधीतून नागभीड नगरपरिषदेला निधी प्राप्त झाला असून या निधीतून पाण्याची तीव्र टंचाई असलेल्या नगरपरिषद क्षेत्रात 22 कुपनलिकेची सोय करण्यात आलेली आहे.नागभीड नगरपरिषद क्षेत्रात अकरा गावे समाविष्ट आहेत.. या गावात मुबलक प्रमाणात पाण्याची सोय व्हावी यासाठी ज्या ठिकाणी आवश्यक आहे तिथे या योजनेच्या माध्यमातून कूपनलिका मारण्याचे काम सुरू आहे…
या योजनेच्या शुभारंभ प्रसंगी नागभीड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष डॉ. प्रा.उमाजी हिरे न.प.उपाध्यक्ष,गणेश तर्वेकर , राहुल कंकाळ मुख्याधिकारी ,सचिन आकुलवार बांधकाम सभापती , अर्चना मरकाम सभापती स्वच्छता, दुर्गा चिलबुले नगरसेवक ,उमेश शेंडे पाणी पुरवठा अभियंता, सोनु दुपारे लिपिक पाणी पुरवठा, सुधाकर अम्रूतकर,रमेश ठाकरे,तानाजी अम्रूतकर, भुपेश चिलबुले , नरहरी सहारे ,गिरीधर अम्रूतकर ,ताराचंद अम्रूतकर , रामराव अम्रूतकर , राजूभाऊ चिलबुले , सतिश तर्वेकर,मनोज रडके,प्रा.कुलुरकर सर, नान्हे सर , प्रविण भोले ,रमेश गिरडकर , मंगेश अम्रूतकर , गुड्डू राउत ईत्यादी मंडळी उपस्थित होती.