गोंडपिपरी तालुक्यातील भणारहेटी शेत शिवारात सागवान तस्करी
राला – भाठव्याची कमाल ..साला चेकाआष्ठा तरं भाटवा चेक घडोली
आरोपी वनाधिकारी यांच्या ताब्यात
राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी :- चेक आष्ठा गावात येथील एका सागाचा माल तनसीमध्ये झाकून ठेवलेल्या सागवन मालावर वनविभागाच्या चमूने धाड टाकून आज आरोपिला रंगेहाथ पकडले वाहन चालक व मालकासह दोन आरोपि ना ताब्यात घेतले असून माल जप्त केले आहे पिक अप मध्ये भरुन मोठ्या प्रमाणात सागवनाची धाबा वनपरीक्षेत्र जंगलातुन दिवसा ढवळ्या तस्करी होत असतांना येथील वनविभागाच्या कार्यप्रणाली वर प्रश्न चीन्न निर्माण झाले आहे गोंडपिपरी व पोंभुर्णा तालूक्यात रोटी बेरोटी चे व्यवहार चालतात यांतच पोंभुर्णा तालुक्यातील चेक आष्ठा गावात राहणाऱ्या साईनाथ बोडेकर आणि गोंडपिपरी तालुक्यातील चेक घडोली गावचे शरद काळे या दोघांनी मिळून मागील काही दिवसांपासून बेत रचून खराळपेट जंगल क्षेत्रातील सागवान वृक्ष तस्करी करण्याचा प्रकार चालवीला चेक घडोली गावापासून तालुक्यातील भणारहेटी शेत शिवारात लागुन आहे शिवारातील साईनाथ पेंन्दोर यांच्या शेतात सागवण लाकूड भरलेला पिक अप उभा असल्याची माहिती स्थानिक वनकर्मचारी यांना मीळाली पथकाने मोक्यावर धाड टाकली असता पिक अप वाहणात सुमारे 29 सागफाटे आढळून आले पिक अप अतुल पिंपळशेंडे यांच्या मालकीची आहे यावेळी चालक व मालक म्हणुन तो स्वतः हाजर होता वन पथकाने त्यांच्यासह शरद व साईनाथ या दोघांनाही चौकशी साठी ताब्यात घेतले प्रत्यक्ष दश्सिने दिलेल्या माहितीनुसार यावेळी वरील तिनही आरोपी शिवाय त्यांच्यासोबत ईत्तर चार ते पाच आरोपी होते या प्रकरणी अधीक तपास क्षेत्रसहायक ढूमणे करीत आहेत