नांदेड-जम्मू तावी हमसफर आता १८ डब्ब्यांसह

नांदेड-जम्मू तावी हमसफर आता १८ डब्ब्यांसह

नांदेड-जम्मू तावी हमसफर आता १८ डब्ब्यांसह

बालाजी पाटील
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी
9420413391

अकोला : दक्षिण मध्ये रेल्वे मार्गावरील अकोला मार्गे धावणारी हमसफर नांदेड-जम्मू तावी हमसफर एक्स्प्रेसच्या दोन्हीकडील गाड्यांमध्ये दोन डब्ब्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ही गाडी आता १८ डब्ब्यांसह धावणार आहे. गाडी संख्या क्रमांक १२७५१ आणि १२७५२ ही हुजूर साहिब नांदेड-जम्मू तावी- हुजूर साहिब नांदेड साप्ताहिक हमसफर एक्स्प्रेस अकोला मार्गे धावते. या गाडीवरील वाढती प्रवाशी संख्या लक्षात घेता दक्षिण मध्ये रेल्वे प्रशासनाने कोच रचनेत व संख्येत कायम स्वरूपी बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
या गाडीत आत्तापर्यंत १६ डब्बे लावले जात होते. ज्यात १३ तृतीय श्रेणी वातानुकुलीत, दोन लगेज कम जनरेटर ब्रेक व्हेन आणि एक खानपान डब्बा असे १६ डब्बे होते. आता ता. १ एप्रिल रोजी नांदेड येथून सुटणाऱ्या गाडीमध्ये आणि ता. ३ एप्रिल रोजी जम्मू तावी येथून सुटणाऱ्या गाडीमध्ये १६ ऐवजी १८ डब्बे लावले जातील. यात दोन लगेज कम जनरेटर ब्रेक व्हेन, एक खानपान डब्बा, नऊ तृतीय श्रेणी वातानुकुलीत डब्बे आणि सहा द्वितीय श्रेणी शय्या (स्लीपर क्लास) डब्बे असतील. या गाडीमध्ये तृतीय श्रेणी वातानुकुलीतचे चार डब्बे कमी करण्यात आले आहे. त्याऐवजी दोन वाढीव डब्ब्यास सहा डब्बे द्वितीय श्रेणी शय्या (स्लीपर क्लास) वाढविण्यात आले असल्याची माहिती दक्षिण मध्ये रेल्वेच्या नांदेड विभागातर्फे देण्यात आली.
अकोला-तिरुपती रेल्वेला ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
बालाजीला जाणाऱ्या भाविकांसाठी आणखी पाच महिने प्रवास सुविधा