महिला डॉक्टरचा लॉजमध्ये भयावह शेवट, धक्कादायक घटनेनं नांदेड हादरल 

महिला डॉक्टरचा लॉजमध्ये भयावह शेवट, धक्कादायक घटनेनं नांदेड हादरल 

महिला डॉक्टरचा लॉजमध्ये भयावह शेवट, धक्कादायक घटनेनं नांदेड हादरल 

बालाजी पाटील
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी
9420413391

नांदेड : – नांदेड शहरातील एका लॉजमध्ये महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित महिला डॉक्टर मागील दोन दिवसांपासून याच लॉजमध्ये राहत होती.
नांदेड, 25 मार्च: नांदेड (Nanded) शहरातील एका लॉजमध्ये महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित महिला डॉक्टर मागील दोन दिवसांपासून याच लॉजमध्ये राहत होती. घटनेच्या दिवशी बराच वेळ महिला डॉक्टरनं आपल्या खोलीचा दरवाजा उघडला नाही. त्यामुळे लॉजच्या मॅनेजरला संशय आला. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती वजिराबाद पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून घटनेच्या तपासाला सुरुवात केली आहे.

विद्या अमोल सुंकवाड असं आत्महत्या करणाऱ्या महिला डॉक्टरचं नाव आहे. ती नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील रहिवासी होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत विद्या यांनी 22 मार्च रोजी नांदेड शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील पंजाब लॉजमध्ये एक रुम बुक केली होती.