आयपीएलचे हे नवीन नियम सर्व खेळाडूंना पाळणे बंधनकारक

आयपीएलच्या पंधराव्या सत्राची सुरुवात गतविजेता चेन्नई आणि कोलकाता ह्या संघांमधील सामन्यापासून होणार आहे. तर ह्या सत्रासाठी केवळ एकूण आसनक्षमतेच्या २५ टक्के प्रेक्षकांना मैदानात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आयपीएलचे हे नवीन नियम सर्व खेळाडूंना पाळणे बंधनकारक

मनोज कांबळे
२५ मार्च, मुंबई: जगातील सर्वात लोकप्रिय टी-२० स्पर्धा आयपीएलला उद्यापासून सुरुवात होणार आहे. हे आयपीएलचे १५ वे वर्ष असून या वर्षी एकूण १० संघ स्पर्धेमध्ये उतरणार आहेत. नवीन संघ नवीन खेळाडूंसह आयपीएलचा चषक जिंकण्यासाठी पुढचे दोन महिने शर्थीचे प्रयत्न करताना दिसणार आहेत. ह्या कालावधीत दहा संघ मुंबईतील वानखेडे, ब्रेबॉर्न आणि डी.वाय. पाटील आणि पुणे या चार स्टेडियम्सवर ७० सामने खळणार आहेत. हि स्पर्धा सुरु होण्याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमांमध्ये मोठे बदल जाहीर करण्यात आले होते. हे नियम आयपीएलमध्ये हि लागू होणार असून संघाना या नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.

डीआरएसच्या संख्येत वाढ

The Decision Review System (DRS), म्हणजेच डीआरएसच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. पंचांचा निर्णय न पटल्यास त्याबद्दल फेरविचार करण्यासाठी संघाना आत यादों डीआरएस घेण्याच्या संधी मिळणार आहेत.

फलंदाज कॅच आऊट झाल्यानंतर…
याअगोदर फलंदाज कॅच आऊट झाल्यानंतर झाल्यानंतर दोन्ही फलंदाजांनी पिच क्रॉस केली असल्यास नवीन खेळाडू ऐवजी मैदानावर असलेलाच खेळाडू पुढील बॉल खेळत असे. परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे नियम ठरवणाऱ्या एमसीसी क्रिकेट क्लबने या नियमामध्ये मोठा बदल केला आहे. आता एखादा खेळाडू कॅच आऊट झाल्यानंतर नवीन उतरणारा खेळाडूच पुढील बॉलचा सामना करेल, असे ठरवण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हे नियम ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या वर्ल्डकपपासून लागू होणार असले तरी, आयपीएलमध्ये हे नियम ह्या वर्षापासूनच लागू होणार आहेत.

खेळाडूंमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्यास
कोरोनाच परिस्थती आटोक्यात असली तरी ती पूर्णपणे संपलेली नाही. याचा विचार करून जर स्पर्धेदरम्यान एखाद्या संघात कोरोनचे रुग्ण आढळ्यास आणि तो संघ मैदानावर ११ जणांचा संघ उतरवण्यास असमर्थ ठरल्यास त्या संघांचे सामने दुसऱ्या दिवशी आयोजित करण्यात येतील.

सुपर ओव्हर सुद्धा बरोबरीत सुटल्यास
आयपीएलचा अंतिम सामना आणि सुपर ओव्हर सुद्धा बरोबरीत सुटल्यास दोन्ही संघांच्या प्राथमिक फेरीनंतरच्या गुणतालिकेवरील स्थानाच्या आधारावर अंतिम सामन्याचा विजेता ठरवण्यात येईल.

आयपीएलच्या पंधराव्या सत्राची सुरुवात गतविजेता चेन्नई आणि कोलकाता ह्या संघांमधील सामन्यापासून होणार आहे. तर ह्या सत्रासाठी केवळ एकूण आसनक्षमतेच्या २५ टक्के प्रेक्षकांना मैदानात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आमच्या इतर लोकप्रिय बातम्या नक्की वाचा

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here