सांस्कृतिक कार्य विभागातर्फे घेण्यात आलेल्या नाट्य प्रशिक्षण शिबिराचा समारोप

सांस्कृतिक कार्य विभागातर्फे घेण्यात आलेल्या नाट्य प्रशिक्षण शिबिराचा समारोप

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- अलिबाग येथे सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य शासन मुंबई यांच्या विद्यमाने घेण्यात आलेल्या नाट्य प्रशिक्षण शिबिराचा समारोप विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. दिनांक १५ ते २४ मार्च २०२५ हा कालावधी नाट्य शिबिराचा होता. सदर नाट्यशिवाराचे प्रशिक्षण रिदम स्टुडिओ हॉल आनंद नगर चेंढरे अलिबाग येथे घेण्यात आले. तसेच त्याचा समारोप श्री विठ्ठल मंदिर सभागृह हॉल वरसोली, अलिबाग येथे सांगता करण्यात आले.
सदर नाट्य प्रशिक्षण शिबिरात नाट्यदिग्दर्शक निर्माते लेखक नृत्य दिग्दर्शक व रंगभूषा व नेपथ्य व अशा विविध कलावंतांनी व नाट्य शिबिरातील नवोदित कलावंतांना मोलाचे मार्गदर्शन केले. समारोपाच्या प्रसंगी नाट्य प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी, नवोदित कलावंतांनी विविध कला, नाट्य, अभिनय, गायन, नृत्य, फॅशन शो, बासरी वादन, ढोलकी वादन अशा विविध कला सादर करण्यात आल्या त्याला उपस्थित मान्यवरांनी व रसिक प्रेक्षकांनी मोठी दाद देऊन नवोदित कलावंतांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी अनेक नवोदित कलावंतांनी सादर नाट्य प्रशिक्षण शिबिराबद्दल महाराष्ट्र शासनाचे व मार्गदर्शन लाभलेल्या लेखक दिग्दर्शक ज्येष्ठ कलावंतांचे व आयोजकांचे सर्वांनी अभिनंदन केले.
सदर समारोप कार्यक्रमाला लेखक दिग्दर्शक व शिबीर संचालक वैभव महाडिक, लेखक दिग्दर्शक किशोर म्हात्रे , अभिनेते योगेश पवार, शासनाचे कार्यक्रम अधिकारी मच्छिंद्र पाटील, नृत्य दिग्दर्शक अमित घरत, प्रसिध्द रंगभूषाकार उलेश खंदारे, मुंबई व प्रकाश योजनाकार प्रकल्प वाणी तसेच अलिबाग तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात लेखक दिगदर्शक वैभव महाडिक यांनी लेखन,दिगदर्शन आणि अभिनय यावर शिबिरार्थींना मार्गदर्शन केले, जे आधुनिक रंगभूमी वर काम करण्यासाठी अतिशय उपयुक्त आणि प्रत्येक कलाकाराला शिकण्यासारखे आहे. ज्यात त्यांनी वाचिक अभिनय, बॉडी लँग्वेज, आधुनिक रंगभूमी, आवाजाचे चढउतार, चेहऱ्याचे हावभाव, इतर व्यायाम व सादरीकरण अशा अनेक बाबी उत्तमरीत्या शिकवल्या. तसेच प्रसिद्ध रंगभूषाकार उलेश खंदारे, नृत्य दिगदर्शक अमित घरत, आणि इतर मान्यवरांनी नेपथ्य, संगीत, वेशभूषा, प्रकाशयोजना या नाटकाच्या महत्त्वाच्या घटकांवर मोलाचे मार्गदर्शन केले. या शिबिरात ऋग्वेद पडोळे, संदिप पाटील, सारा पडोळे, महेंद्र म्हात्रे, सई पडोळे, हृषिकेश कडू, देवदत्त घरत, नंदकुमार कडू, अतूल पिलावे, ओम थोडसरे, रुपाली वाघमारे, तृप्ती पाटील, आराध्य पाटील, रंजना पाटील, प्रकाश पाटील, बी.एन.पाटील, नंदकिशोर पाटील, नयना पाटील या प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला होता.
नवोदित कलाकारांनी कबड्डी, कविता आणि फॅशन शो नावाची नाटिका सादर केली. आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला तसेच शिबिरात नाट्य प्रशिक्षण शिबिरातील नवोदित कलावंतांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य शासन मुंबई यांचे नाट्य प्रशिक्षण शिबीर यशस्वी केल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले.