दिव्यांगांसाठी बच्चू कडू यांचे शिवतीर्थ रायगड येथे अन्नत्याग आंदोलन
✍️ दिलीप करकरे ✍️
माणगाव तालुका प्रतिनिधी
📞7208708456📞
माणगाव : दिनांक 21, 22 व 23 मार्च रोजी बच्चू कडू यांचे दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन करण्यात आले व त्या आंदोलनादरम्यान 23 मार्च रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करून सरकारला दिव्यांग बाबतीत असलेला दुजाभाव सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी शिवतीर्थ रायगड येथून स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड येथून राज्याच्या राजधानीला गर्भित इशारा देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने भाऊंच्या आंदोलनासाठी उपस्थित सहभाग नोंदवला व उत्स्फूर्तपणे आंदोलन यशस्वी करून दिव्यांगासाठी रायगड जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क करून एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात योग्य ते निर्णय मुख्यमंत्री व बच्चुभाऊ कडू यांच्या समवेत मीटिंग आयोजित करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे व सदर मीटिंगमध्ये सकारात्मक निर्णय घेऊ असे मुख्यमंत्र्यांनी भाऊंना आश्वासित केले आहे.रोजगार हमी योजना मंत्री श्री.भरतशेट गोगावले यांनी भेट देऊन आश्वासित केले की सरकार गांभीर्याने विचार करेल.
दिव्यांगासाठी असलेले तुटपुंजे पंधराशे रुपये मानधन हे सहा हजार रुपये करण्यात यावे या प्रमुख मागणीसह दिव्यांगांना विनाअट घरकुल तसेच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत. या आंदोलनात राज्यभरातून हजारो दिव्यांग स्वखर्चाने आंदोलनात सहभागी झाले व आपल्या व्यथा बच्चुभाऊ कडू यांच्याकडे मांडल्या सरकार न मागता लाडक्या बहिणीला पंधराशे वरून एकवीसशे रुपये न मागता देत आहे. दिव्यांगाचे आपल्याला एक गठ्ठा मतदान होत नाही ह्याच हेतूने राजकीय पक्ष दिव्यांगाकडे सहानुभूतीने पाहत नाही हे बच्चू कडू यांनी निदर्शनास आणून दिले.
हे आंदोलन यशस्वी होण्यासाठी श्री महेश बडे यांचे नियोजनात्मक आयोजन व श्री सुरेश मोकल प्रहार दिव्यांग क्रांती संस्था सचिव व कोकण विभाग अध्यक्ष, तसेच रायगड जिल्हा अध्यक्ष श्री सुनील घनमोडे व रायगड जिल्हा कार्याध्यक्ष श्री रविंद्र सांगले यांच्या सह सौ. सुजाता मोकल यांच्या विशेष मेहनतीने व सर्व नियोजन समिती सदस्य यांनी खूप मोलाचे सहकार्य केले. यासाठी महाड तालुकाध्यक्ष फैज हुजुक व माणगाव तालुका कार्याध्यक्ष नरेश साळवे यांचे विशेष सहकार्य लाभले.सामाजीक कार्यकर्ते श्री. संतोषजी खाडे साहेब श्री . निलेश जी तलवटकर साहेब श्री .विनायक उंडरे साहेब सुद्धा आवर्जून उपस्थित होते.