वैद्यकीय अधिकारी व खासगी डॉक्टर्स करिता राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यशाळा आयोजित

वैद्यकीय अधिकारी व खासगी डॉक्टर्स करिता राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यशाळा आयोजित

✍🏻मंजुषा सहारे ✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मो 9373959098

नागपूर :- सविस्तर माहिती पुढील प्रमाणे नागपूर महानगरपालिकेच्या वतीने सोमवारी (ता.२४) वैद्यकीय अधिकारी व खासगी डॉक्टर्स करिता राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेत नागपूर महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, सहायक संचालक कुष्ठरोग डॉ. विजय डोईफोडे, मनपा अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, लता मंगेशकर हॉस्पिटलचे कुष्ठरोग विभाग प्रमुख डॉ. सुशील पांडे, अधीक्षक नागरी कुष्ठरोग पथक -३ चे वैद्यकीय अधिकारी डॉ. सिद्दीक अहमद शेख, डॉ. संजय पुलकवार, डॉ. शाजीया शम्स, डॉ. दिपिका साकोरे, डॉ. महेंद्र चांदुरकर, मनपाचे झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनील कांबळे, डॉ. दीपांकर भिवगडे, पीएचयू अर्चना खाडे यांच्यासह मोठ्या संख्येत आरोग्य अधिकारी, खासगी डॉक्टर्स आदी उपस्थित होते.