मोहफुल तसेच तेंदू पत्ता संकलन करताना दक्षता घ्या : वन्यजीवप्रेमी अजय कुकडकर
✍️ लुकेश कुकडकर ✍️
गडचिरोली तालुका प्रतिनिधी
मो 8999904994
गडचिरोली : सद्यःस्थितीत पानगळीला सुरुवात झाली असल्याने मोहफूल संकलनाची चाहूल लागली आहे.
मात्र मोहफूल जमा करताना काळजी घ्या. असे आव्हान वन्यजीव प्रेमी अजय कुकडकर यांनी केले आहे.
मोहफूल तसेच तेंदू पत्ता जास्त प्रमाणात मिळावे, यासाठी ग्रामीण भागातील नागरिक पहाटेच्या अंधारातच जंगलात जातात. परंतु पहाटे अंधारात मोहफूल संकलनाला जाणे धोक्याचे ठरू शकते. अशावेळी योग्य ती काळजी न घेतल्यास मानव-वन्यजीव संघर्ष होऊन जीवितास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गडचिरोली जिल्ह्यात वन्यप्राणी व हिंस्त्र प्राण्यांचा वावर आहे. दिवसेंदिवस मानव व वन्यप्राणी संघर्षाच्या घटना घडत आहेत. जास्त मोहफूल आपल्याला भेटावे म्हणून पहाटे तीन वाजता पासून अनेकजण जंगलात व जंगलालगतच्या शेतशिवारात मोहफुलांचे संकलन करतात. अशावेळी पट्टेदार वाघांसह बिबट व अस्वलांचे हल्ले होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी अंधारात मोहफूल संकलन जाऊ नये.
नागरिकांनी मोहफूल संकलन करताना आजूबाजूला शक्यतो जास्त वेळ खाली वाकून मोहफूल गोळा करू नये. एकट्याने जंगलात जाऊ नये, जंगलात चौफेर नजर असावी
म्हातारे व कमजोर व्यक्तींनी जंगलात जाणे टाळावे. जंगलात वाघ दिसल्यास सर्वांनी आरडाओरड करून तिथून निघून जावे. ज्या परिसरात वाघाचे वावर आहे त्या ठिकाणी मोहफुल व तेंदू पत्ता गोळा करणे टाळावे तसेच वनविभागाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे.