कर्करोग तपासणीकरिता वाहन तुमच्या दारी मोहिमेला हिरवी झेंडी दाखवून सुरवात

कर्करोग तपासणीकरिता वाहन तुमच्या दारी मोहिमेला हिरवी झेंडी दाखवून सुरवात

✍️लुकेश कुकडकर✍️
गडचिरोली तालुका प्रतिनिधी
मो 8999904994

गडचिरोली : कर्करोग निदान व जनजागृतीसाठी राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाने वाहन आपल्या दारी मोहीम हाती घेतली आहे. २४ मार्च रोजी हिरवी झेंडी दाखवून हे वाहन रवाना केले.

३० वर्षावरील नागरिकांनी तपासण्या करून कर्करोग मुक्त जीवन जगावे असे आवाहन जिल्हा रुग्णालय व आरोग्य विभाग जि. प. यांनी केले. वाहनाला जि. प. सीईओ सुहास गाडे यांनी हिरवी झेंडी दाखवली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी किलनाके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमित साळवे, असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रेरणा राऊत, प्रशासकीय अधिकारी शंतनू पाटील उपस्थित होते.

तालुकानिहाय नियोजन –

चामोर्शी – २४ ते २७ मार्च, मुलचेरा – २८ मार्च, एटापल्ली – १ ते ३ एप्रिल, भामरागड – ४ ते ५ एप्रिल, अहेरी – ७ ते ८ एप्रिल, सिरोंचा – ९ ते ११ एप्रिल, आरमोरी – १५ ते १६ एप्रिल, देसाईगंज – १७ ते १९ एप्रिल, कुरखेडा – २१ ते २२ एप्रिल, कोरची – २३ ते २४ एप्रिल, धानोरा – २५ ते २६ एप्रिल, गडचिरोली – २८ ते ३० एप्रिल.

जिल्हाभर मोहीम –

जिल्ह्यात २४ मार्च ते २१ एप्रिल दरम्यान कर्करोग तपासणी वाहन जिल्ह्यात फिरेल. गर्भाशयमुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग व मुखाचा कर्करोग इत्यादी तपासण्या होतील