चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात 100 बेड चे कोविड सेंटर तयार :मंत्री विजय वडेट्टीवार
चंद्रपूर जिल्हा महिला साठी 44 बेड अतिरिक्त व्यवस्था, तालुक्यातील कोविड सेंटर साठी झाली आढावा बैठक.

✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर:- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की,चंद्रपूर जिल्हा महिला रुग्णालयात 44 अतिरिक्त बेड वाढविण्यात आले असून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कोविड केअर सेंटर मध्ये प्रत्येक तालुकानिहाय 100 बेडची अतिरिक्त व्यवस्था करण्यात आलेली आहे.
कोरोना रुग्ण वाढीचा वेग आणि त्याकरिता आवश्यक आरोग्य सुविधा यांचा समतोल राखण्यासाठी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी वेगाने करण्यात येत आहे. असे मंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यावेळी सांगितले.